एका बटणावर बदलणार कारचा रंग जाणून घ्या कसा!

बीएम़डब्ल्यू कंपनीने BMW iX फ्लो संकल्पना असलेली नवी गाडी ग्राहकांसाठी आणली आहे
BMW iX car
BMW iX cargoogle

कार घेताना त्याचा रंग हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. एकदा आवडत्या रंगाची कार (Car) घेतली की ती बदलेपर्यंत वापरावी लागते. त्याचा रंग बदलणं तर अशक्यच. पण बीएमडब्ल्यू ग्रुपने ग्राहकांना नवा पर्याय दिला आहे. BMW ग्रुप तुम्हाला एका बटणाच्या स्पर्शाने कारचा रंग बदलू देऊ इच्छितो.

5 जानेवारी रोजी, BMW iX फ्लो नावाची नवी गाडी लॉंच केली आहे. ती इलेक्ट्रोफोरेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. गाडीचा रंग काळ्या ते पांढर्‍या रंगात बदलतो किंवा काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे एकत्रीकरण करतो. iX फ्लो इलेक्ट्रिक iX SUV वर आधारित असून ती BMW ने 2021 मध्ये डेब्यू केली होती.

कार इतकी देखणी आहे की, तीचे आतील-बाहेरील रूप तुम्हाला मोहात पाडते. आम्ही एक तंत्रज्ञान तयार करण्याचा प्रयत्न केला असून ते कारमध्ये रुपांतरित केले आहे, असे BMW ग्रुपचे इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष क्रिस्टोफ ग्रोटे म्हणाले. मुलाखतीदरम्यान, ते म्हणाले की, उष्ण तापमानात वाहन चालवताना तुम्ही सौम्य रंग निवडाल. हे वाहनाच्या आत कार्यक्षमता आणि थर्मल नियमन करण्यास मदत असल्याने शक्य होईल. त्यामुळे अशावेळी तुम्ही पाहिजे तो रंग बदलू शकाल. सध्या, iX फ्लो फक्त पांढरा, राखाडी आणि काळ्या रंगाच्या छटामध्ये बदलू शकतो. पण, कार्ड्सवर अधिक ज्वलंत रंग आहेत.

BMW ग्रुप डिझाईनचे प्रमुख Adrian van Hooydonk यांनी iX ला फ्लोवर रंग बदलणारे तंत्रज्ञान म्हटले आहे. हे म्हणजे सर्व संवेदनांना उत्तेजित करणारी "मानव-केंद्रित" उत्पादने विकसित करण्याच्या गटाच्या योजनेचा एक भाग आहे. BMW ने 2025 पर्यंत भविष्याभिमुख तंत्रज्ञानावर $30 अब्ज ($34 अब्ज) खर्च करणार असल्याचे म्हटले आहे.

BMW iX car
जिओचा सर्वात स्वस्त Disney+ Hotstar देणारा प्लॅन, डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

असे आहेत फायदे

BMW ने स्पष्ट केले की, गिरगिट ज्याप्रमाणे रंग बदलते, त्याचप्रमाणे हे नवे तंत्रज्ञान वाहनाच्या एअर कंडिशनिंगमधून आवश्यक कूलिंग आणि हीटिंगचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे वाहनाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमला आवश्यक असलेली उर्जा कमी होते आणि वाहनाचा इंधन किंवा विजेचा वापरही कमी होतो. सर्व-इलेक्ट्रिक कारमध्ये, हवामानानुसार रंग बदलणे हे श्रेणी वाढविण्यात मदत करू शकते. या कारच्या आतील भागाताबाबात बोलायचे झाल्यास, ती डॅशबोर्डला जास्त गरम होण्यापासून रोखू शकते.

BMW iX car
7 जानेवारीआधी हे काम करा, अन्यथा सिम कार्ड होईल ब्लॉक

ई- इंक टॅक्नोलॉजीविषयी

बीएमडब्ल्यूने वाहनांसाठीचे अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी ई-इंक नावाच्या कंपनीसोबत काम केले. इलेक्ट्रोफोरेटिक कलरिंग हे ई इंकने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यासाठी E-Ink ने Sony आणि Amazon.com सारख्या ब्रँडसाठी Kindle वाचक आणि व्यावसायिक प्रदर्शनांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान विकसित केले आहे.BMW चा ई-इंकचा ऍप्लिकेशन SUV ची संपूर्ण बॉडी कव्हर करण्यासाठी तयार केलेल्या रॅपद्वारे कार्य करते. ई इंक असलेल्या BMW iX फ्लोच्या पृष्ठभागावरील कोटिंगमध्ये मानवी केसांच्या जाडीएवढे व्यास असलेले लाखो मायक्रोकॅप्सूल असतात. या प्रत्येक मायक्रोकॅप्सूलमध्ये नकारात्मक चार्ज केलेले पांढरे रंगद्रव्य आणि सकारात्मक चार्ज केलेले काळे रंगद्रव्ये असतात.

BMW iX car
नोकरीला कंटाळून सुरु केला Business! आता जगात आहे टॉप 1 कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com