Credit Score : आता WhatsApp सांगणार तुमचा क्रेडिट स्कोअर; जाणून घ्या, कसा तपासणार

कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो.
WhatsApp
WhatsApp Sakal

Credit Score WhatsApp : कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर चांगला नसेल तर, तुम्हाला कर्ज किंवा बँकांच्या इतर सुविधा मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

WhatsApp
Children’s Day : मुलांना टीव्ही,मोबाईलपासून दूर करायचंय? खरेदी करा 'ही' इंटरेस्टिंग पॉपअप पुस्तकं

अनेक बँका किंवा काही वेबसाईट क्रेडिट स्कोअर सांगण्यासाठी शुल्क आकारतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का की आता तुम्ही WhatsApp वर तुमचा क्रेडिट स्कोअर अगदी मोफत तपासू शकता? या लेखात आपण व्हॉट्सअपवर कशा पद्धतीने क्रेडिट स्कोअर कसा जाणून घ्यायचा याबद्दल सांगणार आहोत.

WhatsApp
Tech Tips : ऑटोकरेक्ट फीचर कसे असते आणि ते चालू-बंद कसे कराल ?

डेटा अॅनालिटिक्स आणि क्रेडिट स्कोअर प्रदाता एक्सपेरियन इंडियाने व्हॉट्सअॅपद्वारे क्रेडिट स्कोअर सांगणारी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतात अशाप्रकरे एखाद्या क्रेडिट ब्युरोने पहिल्यांदाच अशी सेवा दिली जात आहे.

WhatsApp
WhatsApp : तुम्ही व्हॉट्सअॅप अपडेट केलंत का ? मिळतील हे जबरदस्त फीचर्स

व्हॉट्सअपवर कसा चेक कराल Credit Score

  • सर्वात पहिले Experian India WhatsApp नंबर +91-9920035444 वर ‘Hey’ असे लिहून पाठवा किंवा बारकोड स्कॅन करा.

  • त्यानंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर टाका.

  • यानंतर तुम्हाला तुमचा एक्सपेरियन क्रेडिट स्कोअर व्हॉट्सअॅपवर त्वरित मिळेल.

  • तुम्ही एक्सपेरियन क्रेडिट रिपोर्टच्या पासवर्ड सुरक्षित प्रतीसाठीदेखील विनंती करू शकता, जी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल.

  • तपशीलवार माहितीसाठी तुम्ही https://api.whatsapp.com/message/LBKHANJQNOUKF1?autoload=1&app_absent=0 या लिंकवर भेट देऊ शकता.

WhatsApp
Cardless Cash Withdrawal : एटीएम कार्डशिवायही काढू शकता पैसे; अशी आहे पद्धत

देण्यात येणारी सुविधा सुरक्षित

दरम्यान, एक्सपेरियन इंडियाने सुरू केलेली सेवा जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जगात सर्वाधिक 48.75 दशलक्ष व्हॉट्सअॅप युजर भारतात आहेत. त्यामुळे या सेवेचा सर्वाधिक फायदा भारतीयांन नक्कीच होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com