Children’s Day : मुलांना टीव्ही,मोबाईलपासून दूर करायचंय? खरेदी करा 'ही' इंटरेस्टिंग पॉपअप पुस्तकं

दुसरं काही मुलं आवडीने बघत नाहीत. त्यामूळे पालकांकडेही काही ऑप्शन नाही.
Children’s Day
Children’s Dayesakal

Children’s Day Deal On Amazon : लहान मुलांसाठी मोबाईल हे खेळणे बनले आहे. मुलांनी जेवावे असे वाटत असेल तरी त्यांना मोबाईलवर गेम्स, व्हिडीओ दाखवावे लागतात. असे चित्र प्रत्येक घरात आहे. पालकही मुलांच्या या सवयींला वैतागले आहेत. पण, दुसरं काही मुलं आवडीने बघत नाहीत. त्यामूळे पालकांकडेही काही ऑप्शन नाही.

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे असल्यास त्यांना पॉपअप पूस्तके आणून द्यावीत. ज्यामुळे मुले मोबाईल विसरून जातील. तूम्ही हे वाचून पॉपअप पूस्तके घेण्याच्या विचारात असाल तर अमेझॉन या शॉपिंग साईटवर सेल सुरू झाला आहे. त्याबद्दल माहिती घेऊयात.

Children’s Day
Pune childrens day : पुण्यात 1800 विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा

आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (14 नोव्हेंबर) बालदीन म्हणून साजरा केला जातो. बालदीनाचे औचित्य साधून अॅमेझॉनवर मुलांसाठी खेळणी आणि पुस्तकांवर बेस्ट सेल सुरू आहे. या ऑफरमध्ये मुलांच्या आवडीची पुस्तके 40% पर्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

Children’s Day
Netflix vs Amazon Prime Video : तुम्हालाही Netflix महाग वाटते ? मग एकदा हे वाचाच

फेअरी टेल्स (My First Pop-Up Fairy Tales)

तुम्हाला 3 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूस्तके घ्यायची असतील. तर फेअरी टेल्स हा एक चांगला ऑप्शन आहे. या पूस्तकात असणारी चित्रे थ्रिडी पेंटींगसारखी पॉप अप होतात. त्यामूळे मुलांना ते पूस्तकं हातातून सोडावे वाटणार नाही. या पुस्तकामध्ये लिटन पिग, सिंड्रेला, अलादीन, मरमेडसह अनेक मजेदार कथांचा संग्रह आहे. या पुस्तकांची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते.

Children’s Day
Amazon New Feature : स्वदेशी बनो! आता मराठीतही करता येणार शॉपिंग; कसे ते वाचा

अर्ली लर्निंग लायब्ररी (Peppa Pig Early Learning Library)

जर तुम्हाला मुलांना नूकत्याच बोलायला शिकलेल्या लाडक्या बाळासाठी अर्ली लर्निंग पूस्तक घ्यायचे असेल. तर, एबीसी, नंबर्स, वेगवेगळे आकार, रंग, फळांची ओळख करून देणारे हे पूस्तक चांगला पर्याय आहे. पेप्पा पिगच्या 10 पुस्तकांचा हा एक चांगला संच आहे. हे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या पुस्तकाची किंमत 399 रुपये आहे.

Children’s Day
Amazon Quiz: ॲमेझॉन वर द्या पाच सोपी प्रश्नांची उत्तरे अन् जिंका 500 रुपये

माय फर्स्ट लायब्ररी (My First Library)

हे 1 ते 4 वर्षाच्या मुलांमध्ये लोकप्रिय असलेले हे पूस्तक आहे. यात एकूण 10 हार्ड कव्हर असलेली छोटी पुस्तके आहेत. जी लहान मुलासाठी मार्गदर्शक ठरू शकतील. त्याची किंमत 399 रुपये आहे.

मोरल स्टोरी (Moral Story Books)

जर तुम्हाला मुलांना सकारात्मक संदेश असलेल्या कथांची पुस्तके वाचावी असे वाटत असेल तर तुम्ही हा संच खरेदी करू शकता. अनेक चांगल्या कथांचा संग्रह असलेल्या या पुस्तक संचाची किंमत 240 रुपये आहे.

मॅथॉलॉजी बुक्स (My First Mythology Tale)

मुलांना सध्याच्या घडामोडीसह पौराणिक कथा वाचायला देणे हा चांगला पर्याय आहे. हे अॅमेझॉनच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पुस्तकांपैकी एक आहे. ज्यात 5 पौराणिक देवतांची पुस्तके आहेत. या पुस्तकामध्ये महाभारत, कृष्ण, गणेश आणि रामायणातील कथा असून याची किंमत 179 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com