Mobile Hacking: 'Spyware' अॅपने तुमचा स्मार्टफोन हॅक तर होत नाहीये? या सोप्या ट्रीक्सने चेक करा

भारतासह अनेक देशांतील लोकांच्या फोनमध्ये स्पायवेअर या अॅपने त्यांचा डेटा लिक झाल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टने केलाय.
be alert by Mobile Hacking
be alert by Mobile Hacking esakal

'स्पायवेअर' म्हणजे गुप्तपणे तुमच्यावर नजर ठेवणारा अॅप. हल्ली अशा प्रकारच्या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अलीकडेच जारी झालेल्या लिस्टमध्ये अनेक देशांतील यूजर्सचा डेटा पुढे आलाय. भारतासह अनेक देशांतील लोकांच्या फोनमध्ये स्पायवेअर या अॅपने जागा वेडली आहे.

एका रिपोर्टमध्ये याबाबत धक्कादायक खुलासा झालाय. लाखो अँड्रॉईड यूजर्सचा डाटा या अॅपमुळे लीक होतोय. या अॅपचा निशाणा झालेले प्रत्येक देशांत बघायला मिळाले आहेत. साधारणत: अमेरिका, यूरोप, ब्राजिल, इंडोनेशिया आणि भारतात याची संख्या जास्त आहे.

स्पायवेअर अॅपची माहिती बऱ्याच यूजर्सला नाही. टेकक्रंचने याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. स्पायवेअर अॅप मोबाईल यूजर्सचा डेटा चोरतो. या डेटामध्ये तुमच्या मोबाईलमधील पर्सनल फोटोंसह तुमचे महत्वाचे लॉग इन क्रिडेंशिअल्स असतात. टेक क्रंचला जून महिन्यात एक कॅचे फाईल मिळाली होती. ज्यामध्ये TheTruthSpyने इंटरनल नेटवर्कला डंप केले होते. या कॅचेमध्ये लीक झालेल्या सगळ्या डिवायसेसची माहिती होती.

be alert by Mobile Hacking
'Technology'ने ओळख बनवल्यास 'Mobile Apps' मिळवून देतील 20 लाखांपर्यंत पगार

नाव अनेक, काम एक

TheTruthSpy नेटवर्कमध्ये Copy9,Mxspy,ispyoo,SecondClone,ThespyApp आणि असे अनेक अॅप आहेत. या सगळ्या अॅपचं नाव वेगळं असलं तरी सगळ्यांचं काम एकच आहे. कॉम्प्रेज्ड डेटाच्या मदतीने टेकक्रंचने एक स्पायसर लुकअप टूल तयार केलं आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन हॅक (Hacking news) होतोय की नाही ते चेक करू शकता.

असे करा चेक

यासाठी तुम्हाला एका सेफ डिवाईसची गरज असेल. तुम्ही तुमच्या फॅमिलीमधला कोणाचाही फोन वापरू शकता.

तुम्हाला या डिवाइसने https://techcrunch.com/pages/thetruthspy-investigation/ या पेजवर जायचं आहे. इथे तुम्हाला IMEI आणि Ads ID असे ऑप्शन दिसेल.

तुमचा फोन हॅक झालाय की नाही ते बघण्यासाठी तुम्हाला IMEI नंबर किंवा Ads ID एंटर करावी लागेल.

be alert by Mobile Hacking
Location Tracking: फोन नंबरने लोकेशन कसं ट्रेस करायचं ? या सोप्या ट्रिक्सचा करा वापर

काय आहे इन रिजल्ट्सचा अर्थ

जर तुमच्या फोनमध्ये Ads ID बदललेली असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Spyware इन्स्टॉल केल्या गेल्याचं तुम्हाला कळेल. अशा स्थितीमध्ये हे टूल तुमची मदत करू शकणार नाही. त्याच वेळी लुकअप वर Match असं दिसल्यास याचा अर्थ फोन लीक झालेल्या लिस्टमध्ये असल्याचे तुम्हाला कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com