Location Tracking: फोन नंबरने लोकेशन कसं ट्रेस करायचं ? या सोप्या ट्रिक्सचा करा वापर

मोबाईल नंबरने जर का एखाद्याचं लोकेशन माहिती करून घ्यायचं असेल तर जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स.
Location Tracking: easy tricks
Location Tracking: easy tricksesakal

लोकेशन पाठवून एकादा व्यक्ती कुठे आहे हे जवळपास सगळ्यांनाच जाणून घेता येतं. मात्र बहुतेकांना फोन नंबरने लोकेशन ट्रेस करायचं असतं. याच्या काही ट्रिक्स आहेत. साधारण मोबाईल नंबरचं लोकेशन माहित करण्याच्या बऱ्याच सोप्या ट्रिक्स आहेत. मात्र मोबाईल नंबरचं लाईव लोकेशन परवानगीशिवाय आणि GPS शिवाय ट्रॅक करणं शक्य नसतं. मात्र तुम्हाला मोबाईल नंबरने जर का एखाद्याचं लोकेशन माहिती करून घ्यायचं असेल तर जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स.

बरेच लोक गूगलवरून लोकेशन माहिती करून घेण्याच्या नादात बऱ्याच ट्रीक्स माहिती करून घेतात. मात्र गूगलवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेलच असे नाही. गुगलवर लोकेशन ट्रॅकिंगच्या नावावर काही असेही अॅप्स आणि वेबसाईट्स आहेत जे तुमचा डेटा चोरी करू शकतात. त्यामुळे सावध राहाणंही तेवढंच गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया काही सोप्या ट्रीक्स.

Location Tracking: easy tricks
सॅमसंगच्या 'या' फोनमध्ये GPS कनेक्टिव्हिटीची समस्या; ग्राहकांची तक्रार

१. पहिला उपाय सगळ्यात सोपा आहे मात्र प्रत्येकाला शक्य नसणारा आहे. पोलीस आणि शासकीय संस्था याच उपायांचा वापर करतात. पोलीस किंवा एजंसी टेलीकॉम ऑपरेटरची मदत घेतात. कोर्ट ऑर्डरवर टेलिकॉम कंपनी यूजरला मोबाईल डिटेल्स देतात.

२. फोन कॉलर आयडी - या उपायाने लोकेशन कळणार नाही मात्र कॉल कुठल्या रीजनमधून केला गेला त्याची माहिती कळेल. याव्यतिरीक्त ऑपरेटर आणि दुसऱ्या डिटेल्स पण मिळू शकतात. भारतात कॉलर आयडीसाठी Truecaller चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच्या मदतीने तुम्हाला कॉलरचं रीजन आणि ऑपरेटरबाबत कळू शकतं.

३. गूगल सर्च - अनेकदा यूजरचा नंबर सोशल मीडियावर सर्च करूनही मिळून जातो. तिथूनही तु्म्हाला युजरची डिटेल मिळू शकते.

४. शेअर लोकेशन - तुम्ही कोणाचं लोकेशन त्याच्या परवानगीने सहज जाणून घेऊ शकता. यूजर बऱ्याच अॅपच्या मदतीने त्यांचं लोकेशन शेअर करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com