ट्रॅफिक पोलिसांनी चलन कापलंय हे कसं पाहायचं? जाणून घ्या

How to check Challan Status: वाहतूक पोलिसांनी आपल्या वाहनाचे चलन कापले आहे की नाही हे पाहणं अगदी सोपं आहे.
How to check Challan Status
How to check Challan Statussakal

वाहतूक नियम उल्लंघन दंड (fines after broke Traffic Rules):

आजकाल लोक कुठेही ये-जा करण्यासाठी स्वमालकीची वाहने वापरतात. सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी, त्यात वाया जाणार वेळ किंवा अन्य कारणांमुळे लोक स्वतःची वैयक्तिक वाहने वापरण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु वाहने चालवत असताना सर्वांना ट्रॅफिक नियमांचे (Traffic Rules) पालन करणं अनिवार्य आहे. तुम्ही कळत-नकळत जर या नियमांची पायमल्ली केली तर ट्रॅफिक पोलिसांनी (Traffic Police) तुमचं चलन कापलंच (Traffic Fines challan) म्हणून समजा. आपल्या वाहनाचे चलन पोलिसांनी कापले आहे की नाही हे पाहणं अगदी सोपं आहेत, ते कसं पाहायचं याच्या सोप्या स्टेप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to check Challan Status
सातारा : वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी प्रकरणी १.८१ कोटी दंड

चलन स्थिती कशी तपासायची (How to check Challan Status?)

वाहतूक पोलिसांनी आपलं चलन कापलंय हे कधी-कधी आपल्याला कळतही नाही. याबाबतची माहिती अनेकदा एसएमएसद्वारे मिळते. पण अनेक वेळा तर तेही कळत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्सचं अनुसरण करून ई-चलान स्थिती कशी जाणून घ्यावी याबद्दल माहिती देऊ. यासाठी सर्वप्रथम तुम्ही echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. आता वेबसाइटवर Check online services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर चेक चलन स्टेटस (check challan status) या पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चे पर्याय दिसतील. येथे तुम्हाला वाहन क्रमांक (Registration Number) पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक येथे टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या गाडीचा चासीज नंबर किंवा इंजिन नंबर टाकावा लागेल, जो तुम्हाला तुमच्या RC बुक किंवा कार्डवर पाहाता येतो. आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला 'Get Details (गेट डिटेल) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे चलन कापले गेले आहे की नाही.

How to check Challan Status
हायस्ट्रीट रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पोलिसांनी चुकीचे चालान काढल्यास काय करावे? (What to do if police issue wrong challan?)

कायद्यानुसार ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तुमचे चालान केले तर त्याचा अर्थ तुम्हाला चालान भरावेच लागेल असे नाही. वाहतूक पोलिसांचे चालान हा न्यायालयाचा आदेश नाही. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अशा स्थितीत वाहतूक पोलीस तुमचे चुकीचे चालान कापत असतील, तर त्यावेळी त्यांच्याशी वाद घालू नका, परंतु नंतर न्यायालयात जाऊन चालान काढणे टाळता येईल.

वाहतूकीच्या नियमांचे पालन करा (Follow the Traffic Rules):

रहदारीचे नियम पाळले पाहिजे पण तुमच्याकडून काही चूक झाली असेल, त्या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे तुम्हाला आधीच माहीत असेल, तर तुम्ही न चुकता तेथून बाहेर पडाल. याशिवाय चुकीचे चालान कापण्यासाठी तुम्ही वाहतूक पोलिस कक्षाशी संपर्क साधू शकता. येथे तुम्ही संबंधित अधिकार्‍याशी बोलून तुमची बाजू मांडू शकता आणि तुमच्या युक्तिवादाने तो समाधानी असेल, तर तुमचे चलन रद्द केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com