e-PAN Card : ई-पॅन कार्ड आहे खूपच कामाचं; या लिंकवरुन मिनिटात करा डाउनलोड

e-PAN Card download link : e-PAN डाऊनलोड करण्याची एकदम सोपी प्रोसेस लिंकसह आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
how to download e pan card online
how to download e pan card step by step process esakal
Updated on

Pan Card Benefits : पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असून, करसंबंधी व्यवहारातही याची अत्यंत गरज असते. तांत्रिक प्रगतीमुळे आता डिजिटल स्वरूपातील पॅन कार्ड म्हणजेच e-PAN सहज मिळवता येते. हरवलेले पॅन कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी किंवा फक्त डिजिटल स्वरूपातील कार्ड उपलब्ध व्हावे म्हणून e-PAN डाऊनलोड करण्याचा पर्याय अतिशय उपयुक्त आहे.

काय आहे e-PAN कार्ड?

e-PAN हे पॅन कार्डचे डिजिटल स्वरूप आहे, जे सोयीस्कर व सहज वापरता येते. हरवलेल्या पॅन कार्डासाठी डुप्लिकेट मागवण्यापेक्षा e-PAN अधिक सोयीचे ठरते.

e-PAN कसे डाऊनलोड कराल?

e-PAN कार्ड डाऊनलोड करणे खूपच फायद्याचे आहे. तुम्ही ते digilocker ला ठेऊ शकता. ही पॅन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

how to download e pan card online
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 2 जबरदस्त फीचर्सची एंट्री! कसं वापरायचं? पाहा एका क्लिकमध्ये

1.अधिकृत एनएसडीएल वेबसाइटवर जा. तिथे e-PAN डाऊनलोड करण्याचा पर्याय निवडा.

2. पॅन क्रमांक, आधार क्रमांक (जर तुम्ही वैयक्तिक युजर असाल) आणि जन्मतारीख योग्य रितीने भरा.

3. कॅप्चा भरा, दिलेल्या अटींना संमती द्या, आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

4. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल किंवा ईमेलवर ओटीपी येईल. हा ओटीपी भरून पुढे जा.

5. e-PAN तयार करण्यासाठी रु. 8.26 (जीएसटीसह) इतकी फी भरणे आवश्यक आहे. तुमच्या सोयीचा पेमेंट पर्याय निवडा आणि शुल्क भरा.

6. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीसंदेश आणि ट्रान्झॅक्शन रिफरन्स नंबर मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचे e-PAN कार्ड डाऊनलोड करू शकता.

how to download e pan card online
Flipkart Big Saving Days Sale : खुशखबर! फ्लिपकार्टवर सुरू झालाय बिग सेव्हिंग डेज सेल; 70% पर्यंत खास डिस्काउंट ऑफर्स,पाहा

e-PAN चे फायदे-

हरवलेले पॅन कार्ड मिळवण्याची सोय. डिजिटल स्वरूपामुळे नेहमीच सोबत ठेवण्याची गरज नाही. करसंबंधी व्यवहार आणि ओळख सादर करण्यासाठी उपयुक्त आहे.

e-PAN डाऊनलोड करताना पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक जवळ ठेवा.तुम्हाला सहज आणि जलद प्रक्रिया हवी असल्यास एनएसडीएल पोर्टलचा वापर करून e-PAN कार्ड मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com