Instagram Views : इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त ही Settings सुरू करा, व्हिडीओवर झटक्यात मिळणार लाखो व्ह्यूज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram Views

Instagram Views : इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त ही Settings सुरू करा, व्हिडीओवर झटक्यात मिळणार लाखो व्ह्यूज

Instagram Views : आजचे तरुण मंडळी इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवतात. इंस्टाग्रामवर व्हिडीओ, फोटो शेअर करतात. अनेक लोकांची तक्रार असते की त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला हवे तसे व्ह्यूज मिळत नाही.

अनेकजण त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला एक हटके ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे व्ह्यूज झटक्यात वाढणार. (how to get Instagram Views so fast do these settings in your instagram account read story)

  • जर तुमच्या अकाउंटवर तुम्ही एक सेटींग सुरू केली तर तुमच्या व्हिडीओला झटक्यात व्ह्यूज मिळणे सुरू होणार. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

  • यासाठी सुरवातीला तुमच्या अकांउटवर जा.

  • उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉटलाईनवर क्लिक करा.

  • त्यानंतर सेटींगमध्ये जा.

  • तिथे तुम्हाला अकाउंट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

  • तिथे तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसेल अकाउंट स्टेटस. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसेल Recommendation Guidelines, त्यावर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला कळेल की तुमचं अकाउंट ओके आहे का? जर तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर येथे क्रॉस सिम्बॉल दिसेल आणि हेच प्रॉब्लेम्स तुमचे व्हिडीओचे व्ह्यूज वाढवण्यास अडथळे निर्माण करतात.

  • त्यामुळे तुमच्या अकाउंटवरील त्रुटी समजून घ्या आणि हे प्रॉब्लेम्स दूर करण्याचा प्रयत्न करा.