Aadhaar Lock : तुमचं आधार कार्ड करता येतं 'लॉक', कोणीही करु शकणार नाही गैरवापर; जाणून घ्या प्रक्रिया

कोट्यवधी भारतीयांचा आधार कार्ड डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
Aadhaar Lock Process
Aadhaar Lock ProcesseSakal

कोट्यवधी भारतीयांचा आधार कार्ड डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या फाईल्स हॅकरने रिमूव्ह केल्या असल्याचंही नंतर समोर आलं होतं. मात्र, डार्क वेबवर कित्येक भारतीयांचं नाव, पत्ता, आधार नंबर, फोन नंबर आणि इतर बायोमॅट्रिक डीटेल्स देखील उपलब्ध आहे.

आपल्या आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI कित्येक फीचर्स पुरवते. मात्र, कित्येकांना याबाबत माहितीच नाही. अगदी आधार कार्डच्या बायोमॅट्रिक डेटाला लॉक करण्यासाठी देखील एक खास फीचर आधारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामुळे तुमचा डेटा चोरीला जाण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते.

अशा प्रकारे करा सेटिंग

आधार बायोमॅट्रिक्स लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर भरपूर पर्याय उपलब्ध होतील. यातील Virtual ID (VID) Generator या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा VID जनरेट करुन मिळेल. हा आयडी लिहून ठेवा.

यानंतर पुन्हा माय आधारमध्ये जा. समोर आलेल्या पर्यायांपैकी Lock/Unlock Biometrics हा पर्याय निवडा. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला काही डीटेल्स मागितल्या जातील. यामध्ये तुमचा VID, पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा अशा डीटेल्स भराव्या लागतील. यानंतर तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचं आधार कार्ड लॉक होईल. (Tech News)

काय आहे फायदा?

यानंतर तुमच्या आधार कार्डवर सेव्ह असलेले तुमचे बायोमॅट्रिक्स कोणीही वापरू शकणार नाही. तुम्ही आपली VID जर कोणाला शेअर केली, तर ती व्यक्ती केवळ तुमचा आधार नंबर वापरू शकेल. तुमच्या बायोमॅट्रिक्सचा अ‍ॅक्सेस त्याला मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com