
Holi Mobile Safety Tips : होळीचा सण परंपरा, आनंद आणि रंगांची उधळण यासाठी खास आहे. पण या सणाच्या धमालमध्ये आपल्या स्मार्टफोनसाठी एक मोठा धोका आहे तो म्हणजे पाणी आणि रंग! जर तुमचा फोन रंगाने माखला किंवा पाण्यात बुडाला तर घाबरू नका. काही झटपट काही सोप्या टिप्सने फोनचे कायमचे नुकसान होण्यापासून वाचवता येऊ शकते. चला तर मग रंगपंचमीला फोनला रंग आणि पाणी यापासून वाचवण्यासाठी काय करावं ते जाणून घेऊया.
फोन त्वरित बंद करा
जर तुमचा फोन पाण्यात बुडालेला असेल किंवा रंग लागला असेल, तर ताबडतोब फोन बंद करा. फोन बंद करणे यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका कमी होतो आणि आतल्या भागांचे नुकसान टाळता येते.
अॅक्सेसरीज काढा
फोनच्या केस, सिम कार्ड, मेमोरी कार्ड आणि इतर जोडलेल्या अॅक्सेसरीज काढून टाका. यामुळे फोनला हवा मिळेल आणि तो चांगल्या प्रकारे वाळू शकेल.
अतिरिक्त पाणी आणि रंग पुसून टाका
कोरड्या मायक्रोफायबर कपड्याने किंवा टिश्यूने फोनच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त पाणी आणि रंग पुसून टाका. पोर्ट्समध्ये फुंकर मारू नका, कारण त्यामुळे पाणी किंवा रंग अधिक आत जाऊ शकतो.
फोनला लगेच चार्ज करू नका
फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत, कमीत कमी 24 तास चार्जिंग पोर्टमध्ये चार्जर टाकू नका. ओला मोबाईल चार्ज केल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि फोन कायमचा खराब होऊ शकतो.
स्पीकर आणि चार्जिंग पोर्ट साफ करा
सॉफ्ट ब्रश किंवा कम्प्रेस्ड एअरचा वापर करून स्पीकर ग्रिल्स आणि चार्जिंग पोर्टमधून रंग काढा.
रंग अडकले असल्यास, कॉटन स्वॅबचा वापर करा
फोनच्या स्पीकर किंवा पोर्टमध्ये रंग अडकले असल्यास, कॉटन स्वॅबने काळजीपूर्वक सफाई करा.
जर तुमचा फोन अजूनही काम करत नसेल तर त्याची आवाजाची क्वालिटी खराब असेल किंवा डिस्प्लेमध्ये समस्या येत असतील तर लगेच मोबाईलच्या दुकानात जाऊन तो तपासून घ्या.
वॉटरप्रूफ फोन पाऊच वापरा
जर तुम्ही फोनला रंग आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवायचं असेल, तर वॉटरप्रूफ फोन पाऊच वापरणे चांगले आहे.
प्लास्टिक कवर किंवा झिप-लॉक बॅगचा वापर करा
जर पाऊच नसेल, तर प्लास्टिक कवर किंवा झिप-लॉक बॅग वापरून फोन सुरक्षित ठेवा.
कोरड्या कपड्याचा वापर करा
कोरड्या मायक्रोफायबर कपड्याचा वापर करून फोनवरील ओलावा किंवा रंग लगेच पुसून टाका.
सणाच्या मजेत फोनचा वापर टाळा
होलीच्या सणात अनावश्यक फोन वापर टाळा, त्यामुळे फोनला रंग किंवा पाणी लागण्याची शक्यता कमी होईल.
लक्षात ठेवा की फोनला रंग किंवा पाणी लागल्यास त्वरित योग्य उपाय करा आणि तुमच्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी साध्या टिप्स वापरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.