Smartphone Tips: स्मार्टफोन ऐकतोय तुमच्या बेडरुममधील गप्पा? सेटिंगमध्ये त्वरित करा बदल, अन्यथा पडेल महागात

अनेकदा आपण स्मार्टफोन्समधील अ‍ॅप्सला कॅमेरा, मायक्रोफोनची परवानगी देतो. मात्र, या परवानगीमुळे तुमचे खासगी बोलणे रेकॉर्ड होऊ शकते.
Smartphone
SmartphoneSakal

How to Stop Your Phone From Listening to You: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट सतत आपल्यासोबत असते ते म्हणजे स्मार्टफोन. आज प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन गरजेचा झाला आहे. मात्र, अनेकदा स्मार्टफोन धोकादायक देखील ठरू शकता. नावाप्रमाणेच फोनमध्ये अनेक 'स्मार्ट' फीचर्स मिळतात. त्यामुळे गुगल वॉइस असिस्टेंट, अ‍ॅपल सिरीच्या माध्यमातून फोन आपले बोलणे तर ऐकत नाही ना? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर या प्रश्नाचे उत्तर हो आहे.

स्मार्टफोनला कॅमेऱ्यापासून ते माइकपर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी परमिशन देत असतो. मात्र, परवानगी देता त्याचा कसा वापर केला जातो, हे आपल्याला माहित नसते.

Smartphone
Christmas 2022: प्रियजनांना स्मार्टफोन गिफ्ट द्या अन् ख्रिसमस बनवा खास, पाहा 'हे' बेस्ट डिव्हाइस

मायक्रोफोनची परवानगी देऊ नका

गुगल वॉइस असिस्टेंटसाठी यूजरला मायक्रोफोनची परवानगी द्यावी लागते. अ‍ॅपल सिरी, अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा या व्हर्च्यूअल असिस्टेंटचा वापर करताना देखील परवानगी द्यावी लागते. फोनमधील वॉइस टू स्पीच फीचरचा वापर करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे. परंतु, या परवानगीमुळे वॉइस असिस्टेंट तुमचे बोलणे ऐकतो.

फेसबुककडून मागितली जाते परवानगी

फेसबुक देखील यूजरकडून मायक्रोफोनची परवानगी मागते. टॅफ टू स्पीच आणि व्हीडिओ चॅटिंगसाठी परवानगी द्यावी लागते. अनेकदा आपण कोणताही विचार न करता परवानगी देतो, मात्र यामुळे तुमच्या खासगी बोलणे रेकॉर्ड केले जाते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये बदल करू शकता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अँड्रॉइड यूजर्स सहज बंद करू शकतात सेटिंग्स

  • सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग्समध्ये जा.

  • आता सिक्योरिटी अँड प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.

  • आता प्रायव्हसीवर क्लिक करा.

  • येथे मायक्रोफोन, कॅमेरा आणि इतर सेंसर्सची माहिती मिळते.

  • तुम्हाला कोणत्याही अ‍ॅप्सला परवानगी दिली आहे, याची माहिती मिळेल.

  • येथून तुम्ही परावनगी काढून घेऊ शकता.

iOS यूजर्स सहज बंद करू शकतात सेटिंग्स

  • यासाठी सर्वात प्रथम सेटिंग्समध्ये जा.

  • येथे सिक्योरिटी अँड प्रायव्हसी पर्याय दिसेल.

  • आता मायक्रोफोन लेबलवर क्लिक करा.

  • त्यानंतर ज्या अ‍ॅप्सला मायक्रोफोन परमीशन द्यायची नाहीये, त्यावर क्लिक करून रिमूव्ह करा.

Smartphone
Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! Flipkart Sale मध्ये महागडे स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात, ऑफर एकदा पाहाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com