Smartphone Offer: भन्नाट ऑफर! अवघ्या १० हजारात मिळतोय Nothing Phone 1, जाणून घ्या डिटेल्स

हटके फीचर्ससह येणाऱ्या Nothing Phone (1) स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ऑफरचा फायदा मिळाल्यास फोन १० हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल.
Nothing Phone (1)
Nothing Phone (1)Sakal
Updated on

Offer On Nothing Phone (1): Nothing ने काही महिन्यांपूर्वी आपला पहिला वहिला स्मार्टफोन Nothing Phone (1) ला लाँच केले होते. या फोनला भारतीय ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तुम्ही जर या फोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. शानदार फीचर्ससह येणारा हा फोन फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे. Nothing Phone (1) वर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

फ्लिपकार्टवर Nothing Phone (1) चे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २१ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा फोन फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. IDFC FIRST Credit Card EMI ट्रांजॅक्शनवर ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांना ५ टक्के कॅशबॅक मिळेल.

या फोनवर तुम्हाला १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास Nothing Phone (1) ला फक्त ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन ब्लॅक आणि व्हाइट रंगात येतो.

Nothing Phone (1)
Twitter Blue: ट्विटर अकाउंट होणार रंगीबेरंगी! गोल्ड, ब्लू की ग्रे? पाहा तुम्हाला कोणती व्हेरिफाइड टिक मिळणार

Nothing Phone (1) चे फीचर्स

Nothing Phone (1) स्मार्टफोन Glyph इंटरफेससह येतो. फोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. तसेच, एचडीआर१० प्लस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चा देखील सपोर्ट मिळेल. या हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon ७७८+ ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे.

फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर रियरला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. फोनमध्ये नाइट मोड आणि सीन डिटेक्शन देखील दिले आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये फोन १८ तास वापरू शकता. यात फास्ट चार्जिंगचा देखील सपोर्ट दिला आहे. अवघ्या ३० मिनिटांच्या चार्जमध्ये फोन ५० टक्के चार्ज होतो.

Nothing Phone (1)
Tata Cars: टाटा प्रेमींना स्वस्त कार खरेदी करण्याची शेवटची संधी; कारण नववर्षात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com