Smartphone Offer: एकच नंबर! २० हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय Samsung चा स्मार्टफोन, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. फोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.
Samsung Galaxy A33 5G
Samsung Galaxy A33 5GSakal

Discount on Samsung Galaxy A33 5G: नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही इतरांना गिफ्ट देण्यासाठी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही सॅमसंगच्या महागड्या स्मार्टफोनला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता. Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनला ई-कॉमर्स साइटवरून फक्त ६,९९१ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घ्या.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Samsung galaxy A33 वर मिळेल बंपर डिस्काउंट

Samsung galaxy A33 च्या ६ जीबी रॅम मॉडेलला २५,९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनची मूळ किंमत ३२,९९० रुपये आहे. याशिवाय, तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. फोनवर १३,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या दोन्ही ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनला २० हजार रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे.

Samsung Galaxy A33 5G
Year Ender 2022: २०२२ मध्ये 'या' टॉप-५ बाईक्सने गाजवले मार्केट, जाणून घ्या काय आहे खास

Samsung galaxy A33 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोन याच वर्षी भारतीय बाजारात लाँच झाला आहे. फोनमध्ये ६.४० इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ रेशियो मिळतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ६ जीबीपर्यंत रॅम, १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळेल. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची शानदार बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंगचा हा फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. फोन अँड्राइड १२ आधारित OneUI 4.1 वर काम करतो. डिव्हाइसला ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू, ऑसम पीच आणि ऑसम व्हाइट रंगात खरेदी करू शकता. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी डिव्हाइसला आयपी६७ रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा: Mobile Plans: ९० दिवसांच्या वैधतेसह येतो Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन, भरपूर डेटा-हाय स्पीड इंटरनेटचा मिळेल फायदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com