Human Colony On Moon : नासाचं नवं संशोधन; चंद्रावर गड्डेच गड्डे ! वसू शकते मानवी वस्ती

चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती वसवता येऊ शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Human Colony On Moon NASA team says
Human Colony On Moon NASA team saysesakal

चंद्रावर अशे काही गड्डे आहेत ज्यात मानव भविष्यात मानवी वस्ती वसवू शकतो. नासाच्या शास्त्रज्ञानी लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटल (ALRO)च्या मदतीने याचा शोध लावला आहे. चंद्रावरील हे गड्डे पहिल्यांदा २००९ मध्ये पाहिल्या गेले होते. मात्र यावेळी या गड्ड्यांवरील तापामानाचा अंदाज घेतला असता यात भविष्यात मानवी वस्ती वसवता येऊ शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. (Human Colony On Moon NASA team says)

यावेळी वैज्ञानिकांनी नव्याने केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले की चंद्रावर असलेल्या या गड्ड्यांचे तापमान १७ डिग्रीच्या जवळपास आहे. हे वातावरण मानवजातीसाठी अनुकूल आहे त्यामुळे इथे माववी वस्ती वसू शकते. नासा (NASA) शास्त्रज्ञ नोआ पेट्रो म्हणाले चंद्रावर असणारे हे गड्डे चकीत करणारे आहे. या गड्ड्यांधील तापमान सातत्यानं स्थिर राहिलं तर इथे मानवी वस्ती वसवली जाऊ शकते.

Human Colony On Moon NASA team says
'NASA'मध्ये करिअर घडवायचं आहे? पगारही मिळणार बक्कळ, जाणून घ्या जाॅबच्या संधी

चंद्रावरील गड्डे ३२८ फूट खोल

चंद्रावर असलेल्या गड्ड्यांना 'लूनार पिट्स' असं म्हणतात. यांची खोली ३२८ फूट एवढी आहे. या गड्ड्यांचं तापमान सगळीकडून बदलत राहतं. मात्र तापमानात फारसा फरक नसतो. नासाच्या टीमने चंद्राच्या एका भागाची लांबी मोजण्यासाठी कंप्युटर मॉडेलिंगचा वापर केलाय. तसेच नासाच्या म्हणण्यानुसार भविष्यात चंद्रावर असलेल्या गुहांमध्येही राहाणं शक्य आहे. या गुहा लावा ट्यूबच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com