Hyundai Creta CNG
Hyundai Creta CNGEsakal

Hyundai Creta CNG लवकरच बाजारपेठेत होणार दाखल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रिपोर्ट्सनुसार, Hyundai Motors या SUV मध्ये 1.4 लीटर पेट्रोल इंजिन इन्स्टॉल करणार आहे.
Published on

सध्या सीएनजी गाड्यांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसतोय. आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्यांसाठी, देशातील सर्वाधिक पसंतीची एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा येत्या काळात मोठा धमाका करणार आहे. मिड एसयुव्ही सेगमेंटमधील क्रेटाची सीएनजी आवृत्ती आणण्याच्या तयारीत कंपनी आहे. Hyundai Creta CNG व्हेरिएंट चाचणी दरम्यान असे लक्षात आले आहे की ही गाडी टाटा, मारुतीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

आता बघू या Hyundai Creta CNG काय असेल खास ?

1) Hyundai Creta CNG च्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, Hyundai Motors या SUV मध्ये 1.4 लीटर पेट्रोल इंजिन इन्स्टॉल करणार आहे. 

2) हे इंजिन 138 Bhp पॉवर आणि 242 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते परंतु CNG किटमध्ये गेल्यानंतर या इंजिनची पॉवर आणि पीक टॉर्क कमी होईल. या इंजिनमध्ये फक्त 6 स्पीड मॅन्युअल पर्याय अपेक्षित आहे.

3) फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या Hyundai Creta CNG मध्ये हेच फीचर्स दिले जातील. 

4) या वैशिष्ट्यांमध्ये 10.25 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 -इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, समोर हवेशीर सीट, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Hyundai Creta CNG
Datta Jayanti 2022: दत्तजन्माची पौराणिक कथा काय आहे?

आता बघू या Hyundai Creta CNG मधील सुरक्षा वैशिष्‍ट्ये देखील विद्यमान वैशिष्‍ट्ये सारखीच असतील, जी सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम, इलेक्ट्रॉनिक स्‍थिरता नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्‍टम यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

Hyundai Creta CNG
Winter Food : पौष्टिक डिंक अन् मेथीचे लाडू तेजीत; थंडीत ऊर्जा संवर्धनासाठी आहारामध्ये समावेश

तुमच्या सगळ्यांच्या मनात आता एक प्रश्न आला असेल तो म्हणजे Hyundai Creta CNG किंमत काय असु शकते?

अहवालांनुसार, Hyundai ही CNG SUV जानेवारी ऑटो एक्स्पो 2023 पर्यंत लाँच करू शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर Hyundai Creta CNG ची किंमत सध्याच्या व्हेरियंटपेक्षा 50 ते 75 हजार रुपये जास्त असणार आहे. क्रेटा सीएनजी टोयोटा हायरायडरला टक्कर देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com