
Hyundai i20 Waiting Period : ह्युंदाई i20 च्या वेटिंग पिरीयेडमध्ये वाढ; आता इतक्या दिवसांनी मिळणार गाडी...
Hyundai i20 Waiting Period : देशात ह्युंदाईच्या प्रीमियम कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि आता या गाडीचा वेटिंग पिरीयेडही वाढला आहे आणि जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.
या प्रीमियम हॅचबॅक कारसाठी तुम्हाला कमीत कमी १६ आठवडे अर्थात ४ महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. याशिवाय, कंपनीने अलीकडच्या काळात Aura आणि Grand i10 Nios अपडेट केले आहेत.
Hyundai i20 व्हेरिएंट्स आणि इंजिन ऑप्शन
अलीकडेच, Hyundai ने आपल्या i20 चा डिझेल इंजिन पर्याय बंद केला आहे. हॅचबॅकला आता 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो-पेट्रोलचे इंजिन मिळते अन् 1.2-लिटर पेट्रोल 82bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते.
यासह, यात 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल आहे जे 118bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये मॅन्युअल, सीव्हीटी आणि डीसीटी युनिट्स जोडण्यात येणार आहेत. तुम्ही Sports, Asta आणि Asta(O) प्रकारांमधून निवडू शकता. यासह, कंपमी लवकरच BS6 2 इमिशन नियमांनुसार त्याचे इंजिन अपडेट करु शकते.
Hyundai i20 वेटिंग पिरीयेड
1.0-लिटर Sportz DCT ला १४ ते १६ आठवड्यांचा वेटिंग पिरीयेड असेल, तर 1.2-लिटर स्पोर्ट्स मॅन्युअल आणि CVT आणि 1.0-लिटर Asta(O) DCT प्रकारांना ६ ते ८ आठवडे वाट बघावी लागेल.
Hyundai i20 डिझेल
भारत सरकार १ एप्रिल २०२३ रोजी BS6 चा दुसरा टप्पा लागू करणार आहे, त्यानंतर कंपनीला त्यांच्या वाहनांमध्ये बदल करावे लागेल. कंपन्या रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म (RDE) अंतर्गत अपग्रेड न झालेली वाहने बंद करत आहेत, कंपनी Hyundai i20 डिझेल कार बंद करत आहे.