esakal | नव्या Hyundai i20 चा धमाका; फक्त 20 दिवसांत 20 हजार कार बूक 
sakal

बोलून बातमी शोधा

hyundai i20

ह्युंडाईने नुकतंच त्यांची पॉप्युलर हॅचबॅक कार ह्युंडाई i20 लाँच केली होती. या कारला भारतात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

नव्या Hyundai i20 चा धमाका; फक्त 20 दिवसांत 20 हजार कार बूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ह्युंडाईने नुकतंच त्यांची पॉप्युलर हॅचबॅक कार ह्युंडाई i20 लाँच केली होती. या कारला भारतात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. फक्त 20 दिवसात या कारचे 20 हजार जणांनी बूकिंग केलं असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आतापर्यंत 4 हजारांहून अधिक जणांची डिलिव्हरी देण्यात आली आहे. i20 च्या स्पोर्टस आणि त्यापेक्षा हाय एंड ट्रिम्सची मागणी सर्वाधिक राहिली आहे. 

इंजिन आणि ट्रान्समिशन
ह्युडाईची ही कार पेट्रोल, डिझेल आणि टर्बो पेट्रोलमध्ये बीएस 6 इंजिनसह उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन, इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, 7 स्पीड ड्युअर क्लच ट्रान्समिसन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचे पर्याय आहेत.  

हे वाचा - Hyundai आणणार स्वस्तातली मिनी SUV कार

या कारमध्ये पोलर व्हाइट, टायफून सिल्वर, टायटन ग्रे, फिअरी रेड, स्टेरी नाइट आणि मेटॅलिक कॉपर यांसारखे रंग आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना जो रंग आवडतो तो ते निवडू शकतात. एवढंच नाही तर तुम्हाला ड्युअल टोन रंगातही कार उपलब्ध होऊ शकते. यामध्ये पोलर व्हाइट आणि फेअररी रेड यामध्ये काळ्या रंगाचे छत असणार आहे. 

पेट्रोल व्हेरिअंटच्या किंमती 6 लाख 80 हजार रुपयांपासून 9 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये  मॅग्ना 6.79 लाख रुपये, स्पोर्ट्ज- 7.59 लाख रुपये, स्पोर्ट्ज IVT - 8.59 लाख रुपये, Asta - 8.69 लाख रुपये, Asta IVT - 9.69 लाख रुपये, Asta(O) - 9.19 लाख रुपये अशा किंमती आहेत.

हे वाचा - सुरक्षित प्रवासासाठी भारतातील 8 कार पास तर एक नापास; Global NCAP रेटिंग जाहीर

याशिवाय ह्युंडाइच्या i20 डिझेल व्हेरिअंटमध्ये मॅग्नाची किंमत ही 8.19 लाख रुपये इतकी आहे. तर स्पोर्टजची 8.99 लाख रुपये आणि Asta (O) 10.59 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

loading image
go to top