esakal | Hyundai आणणार स्वस्तातली मिनी SUV कार
sakal

बोलून बातमी शोधा

hyundai suv

ह्युंडाई सध्या नव्या कमी किंमतीत एसयुव्ही गाडी बाजारात आणण्यासाठी काम करत आहे. विशेष म्हणजे लहान इलेक्ट्रिक एसयुव्ही असलेली ही गाडी स्मार्ट ईव्ही प्रोजेक्ट अंतर्गत तयार केली जाणार आहे.

Hyundai आणणार स्वस्तातली मिनी SUV कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ह्युंडाई सध्या नव्या कमी किंमतीत एसयुव्ही गाडी बाजारात आणण्यासाठी काम करत आहे. विशेष म्हणजे लहान इलेक्ट्रिक एसयुव्ही असलेली ही गाडी स्मार्ट ईव्ही प्रोजेक्ट अंतर्गत तयार केली जाणार आहे. या मिनी इलेक्ट्रीक एसयुव्हीचे 90 टक्के पार्ट हे भारतात तयार केले जातील. ही कार प्रत्यक्ष बाजारात येण्यास आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. 

अद्याप कारची किंमत किती असेल याची माहिती अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही. मात्र ऑटोमोबाइल क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार ही एसयुव्ही दहा लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत असेल. Hyundai AX असं कोड नेमसुद्धा देण्यात आलं आहे. ही कार दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंगवेळी पाहण्यात आली आहे.

हे वाचा - सुरक्षित प्रवासासाठी भारतातील 8 कार पास तर एक नापास; Global NCAP रेटिंग जाहीर

कंपनीने काही काळ आधी कोना इलेक्ट्रिकचं फेस्टलिफ्ट व्हर्जन लाँच केलं होतं. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवं मॉडेल थोडं लांब आहे. याशिवाय ही कार 16 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. या 16 रंगांमधील 8 रंग हे नवे असतील जे कारमध्ये पहिल्यांदाच मिळणार आहेत. 

सध्या उपलब्ध माहितीनुसार कारमध्ये 39.2 kWh आणि 64kWh असे दोन बॅटरीचे पर्याय आहेत. यामधून अनुक्रमे 136hp आणि 204 hp इतकी पॉवर जनरेट होते. ह्युंदाईची ही इलेक्ट्रिक कार लहान बॅटरीसह 305 किमी तर मोठ्या बॅटरीसह 480 किमीपर्यंत धावू शकेल. भारतात या कारच्या 2019 च्या मॉडेलची किंमत 23.9 लाख रुपये इतकी आहे. या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन कधी लाँच करणार याची माहिती समोर आलेली नाही. 
 

loading image
go to top