TVS-Mitsubishi : ‘मित्सुबिशी’ आता भारतात वाहनविक्री क्षेत्रात करणार प्रवेश; 'टीव्हीएस'सोबत केला करार!

दोन्ही कंपन्यांतील करारानुसार, टीव्हीएस मोबिलिटी आपली मोटार विक्री व्यवसाय बंद करणार असून, तिची १५० दालने मित्सुबिशी प्रत्येक मोटारीच्या ब्रँडसाठी वापरणार आहे.
TVS-Mitsubishi
TVS-MitsubishieSakal

TVS-Mitsubishi Partnership : जपानी उद्योगसमूह मित्सुबिशी कॉर्पोरेशनने भारतात वाहनविक्री क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी टीव्हीएस मोबिलिटी कंपनीशी भागीदारी केली आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशन ‘टीव्हीएस मोबिलिटी’चा ३० टक्के हिस्सा खरेदी करणार असून, सुरुवातीला ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दोन्ही कंपन्यांतील करारानुसार, टीव्हीएस मोबिलिटी आपली मोटार विक्री व्यवसाय बंद करणार असून, तिची १५० दालने मित्सुबिशी प्रत्येक मोटारीच्या ब्रँडसाठी वापरणार आहे. कंपनी सुरुवातीला होंडा कंपनीच्या मोटारविक्री वाढविण्यावर भर देणार आहे.

वाहनांची विक्री, सेवा आणि वितरण यामध्ये आघाडीवर असलेल्या टीव्हीएस मोबिलिटीच्या अनुभवाचा फायदा मित्सुबिशीशी मिळणार आहे. प्रवासी मोटारी, व्यावसायिक वाहने आणि अन्य वाहनांच्या मालकीसंदर्भातील दोन्ही कंपन्यांच्या योजनेला चालना देण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांमध्ये दोन अब्ज डॉलरचा महसूल मिळवण्याची क्षमता या व्यवसायात आहे, असे टीव्हीएस मोबिलिटीचे संचालक आर. दिनेश यांनी सांगितले.

TVS-Mitsubishi
Tata CNG Automatic : टाटाने लाँच केली देशातील पहिली 'ऑटोमॅटिक सीएनजी' कार; जाणून घ्या मायलेज, फीचर्स अन् किंमत..

मित्सुबिशी कॉर्पोरेशनमध्ये ऑटोमोटिव्ह अँड मोबिलिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिगेरु वाकाबायाशी म्हणाले, ‘‘नव्या वाहनांच्या विक्रीसाठी भारत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. २०२३ मध्ये या बाजारपेठेत पन्नास लाख वाहने विकली गेली आणि येत्या काही वर्षात यामध्ये ६ ते ७ टक्क्यांची वाढीची शक्यता आहे.

सुझुकी मोटार वगळता, जपानी वाहन उत्पादकांची उपस्थिती कमकुवत आहे. नव्या कंपनीच्या माध्यमातून जपानी कंपनीच्या मोटारींची विक्री वाढविण्याचे तसेच इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर भर देण्याचे मित्सुबिशीचे उद्दिष्ट आहे. वेगाने वाढत असलेल्या भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी मित्सुबिशी कॉर्पोरेशन टीव्हीएस मोबिलिटी समूहासोबत संबंध अधिक दृढ करत असून, ‘टीव्हीएस ऑटोमोबाईल सोल्युशन्स’मध्येही गुंतवणूक करणार आहे.’’

TVS-Mitsubishi
Citroen C3 Aircross Automatic : 'सिट्रॉन'ने खास भारतीयांसाठी लाँच केली नवी ऑटोमॅटिक एसयूव्ही; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com