गुगलवर 'या' गोष्टी सर्च कराल तर होऊ शकते मोठी फसवणूक

google search
google search

औरंगाबाद: सध्याच्या काळात आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर आपण ती लगेच गुगलवर सर्च करू शकतो. कोणतंही ठिकाण, चित्रपट, व्यक्ती किंवा इतर कोणतीही माहिती आपल्याला गुगलवर लगेच मिळू शकते. पण कधी-कधी गुगल सर्चवर अवलंबून राहणे तुम्हाला बर्‍याच अडचणीत आणू शकते. त्यामुळे गुगल सर्चसंबंधी कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊया.

1. जेंव्हा तुम्ही एखादा कस्टमर केअरचा नंबर शोधत असता त्यावेळेस काळजी घेणं महत्त्वाचं आहे. असे बरेच ऑनलाईन स्कॅम असू शकतात. बऱ्याचदा फ्रॉडस्टर्स फेक बिजनेस लिस्टींग आणि कस्टमर केअर नंबर्स टाकत असतात. त्यामुळे सामान्य लोकं तो नंबर कस्टमर केअरचा नंबर समजून त्यावर कॉल करतात आणि मोठं नुकसान करून घेतात. म्हणून कोणताही कस्टमर केअर नंबर शोधताना काळजी घेण अनिवार्य आहे.

2. ज्यावेळेस तुम्ही एखादी कोणतीही साइट उघडता तेंव्हा त्याची URL चेक केली पाहिजे. खासकरून एखाद्या बँकेची ऑनलाईन साईटला तुम्ही जाऊ पाहत असाल तर URL नक्की चेक करा. कारण इथं बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसते.

3. गुगलवर कोणतेही ऍप किंवा सॉफ्टवेअर सर्च करू नका. जर तुम्हाला कोणतंही ऍप घ्यायचं असेल तर त्याच्या अधिकृत साइटवरून ते डाऊनलोड करून घ्या. नाहीतर Google Play किंवा App Store वरून ते तुम्ही डाउनालोड करू शकता.

4. गुगलवर कधीही कोणतेही मेडिकल सिम्टम सर्च करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. जर तुम्ही आजारी असाल तर डॉक्टरांजवळ गेलं पाहिजे गुगलवर सर्च करून औषधे घेणं टाळलं पाहिजे. 

5. गुगलवरी कोणत्याही मार्केट टिप्स, पर्सनल फायनान्ससंबंधी माहितीवर विश्वास ठेऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com