काय दर्शवतात रस्त्याच्या कडेला असणारे वेगवेगळ्या रंगाचे दगड? काय आहे त्यांचे वैशिष्ट्य? जाणून घ्या

importance of color of mile stone on roads
importance of color of mile stone on roads

नागपूर - आपण प्रवास करताना नेहमीच रस्त्याच्या कडेल वेगवेगळे रंग असलेले दगड दिसतात. त्याला 'माइल स्टोन' म्हणतात. त्यावर ठिकाणाचे नाव आणि अंतर लिहिलेले असते. पण, यावर विशिष्ट रंग का लावतात? याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा आपल्यापैकी काहींनी तसा विचारदेखील केला नसेल. कारण आपले लक्ष फक्त अंतर आणि गावाच्या नावाकडे असते. 

माइल स्टोनवर पिवळा, हिरवा, काळा आणि नारंगी, असे चार रंग लावलेले असतात. तसेच दगडाच्या खालच्या बाजूस पांढऱ्या रंगाने रंगवलेले असते. पण, या रंगाचे महत्व काय आणि ते काय दर्शवतात? याबाबत अनेकांना माहिती नसते. पण, हे दगड खूप महत्वाचे असतात. 

पिवळ्या रंगाचे माइल स्टोन – रस्त्यावर फिरताना किंवा वाहन चालवताना रस्त्याच्या कडेला पिवळा रंग लावलेला दगड तुम्हाला दिसेल. हा दगड पाहिल्यानंतर आपण एखाद्या राष्ट्रीय महामार्गावर चालत आहोत, हे समजायला हवे.

हिरव्या रंगाचे माइल स्टोन – रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचे दगड दिसेल की राज्य महामार्ग लागलाय असे समजायचे. हे राज्य महामार्ग तयार करताना दगडावर हिरवे रंग लावले जातात. या रस्त्यांची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची असते. 

तीन रंगाचे माइल स्टोन - रस्त्याने जाताना दगडावर काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या असे तीन रंग दिसतात. याचा अर्थ आपण मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केला, असा होतो. या रस्त्याची देखभाल महापालिका किंवा जिल्हा प्रशासन करत असते.  

नारंगी रंगाचे माइल स्टोन – नारंगी रंगाचे दगड दिसले की समजायचे आपण गावात आलोय. या रस्त्यांची देखभाल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे केली जाते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com