शहरातील 'पाखरांना' निसर्गाचा ध्यास, पुण्यावरून आलेल्या विद्यार्थ्यांनी धरली शेतीची वाट

मनोहर घोळसे
Thursday, 8 October 2020

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी शहरातून आपआपल्या गावी परतले आहेत. ऑनलाइन शिक्षण तर सुरू आहेच. मात्र, त्यानंतरचा वेळ घालविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी शेतीची वाट धरली आहे.   

सावनेर (जि. नागपूर): मातीपासून दुरावलेल्या पावलांनाही कधीकाळी गावाची ओढ असतेच. या ओढीने पावले आपोआप गावाकडे वळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शिक्षणासाठी शहरात राहणारे विद्यार्थी गावाकडे वळले आहेत. ते वेळ घालवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणानंतर काय, म्हणून वेगवेगळे छंद जोपासत आहेत. मात्र, शहरातील पाखरांनाही निसर्गाची ओढ काही केल्या स्वस्थ बसू देत नाही. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी शेतीची वाट धरली आहे. 

हेही वाचा - महापौर संदीप जोशी म्हणाले, सिमेंट रोडचे अर्धवट कामे पूर्ण करा; नागरिकांच्या रोषाचा सामना करावा...

पुण्यासारख्या शहरात मानसशास्त्र विषयात शिकणारी आयुषी महाविद्यालय बंद असल्याने गावाकडे आली आहे. ती ग्रामीण भागात शेतामध्ये जाऊन शेती काय असते ते समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आयुषीचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. ते नागपुरात राहतात. आई अनिता झाडे या सावनेरमध्ये पालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. वडील गणेश झाडे शिक्षक आहेत. त्यांना शेतीविषयी आवड आहे. त्यामुळे दोघांनीही त्यांच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित शेतीची नाळ जोडून ठेवली आहे. आता शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणानंतर काय म्हणून आयुषीने शेतीची वाट धरली आहे. ती आईच्या घरकामात मदत करून रोजच गावाकडील शेतात जाते आणि तिला जमेल ती कामे करून शेतीचे धडे घेत आहे. तिला निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने खूप बरे वाटते. निसर्ग हा आपला गुरू आहे. निसर्गाकडून आपणास खूप काही शिकायला मिळते, असे आयुषी म्हणाली. 

हेही वाचा - महाराष्ट्रात ‘बलात्कार राज’ सुरू आहे का? विश्वास पाठक म्हणाले, राहुल गांधी यांनी तसदी घ्यावी

कोरोना संक्रमणाच्या एका अनिश्चित कालखंडाने सगळ्यांनाच अस्वस्थ केले आहे. त्यामुळे बहुतांश लोकांवर घरीच बसण्याची वेळ आली आहे. यात गावाकडून शहरी भागात धाव घेणारी तरुण मंडळी व शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. नेहमी मग्न दिनचर्या व आपल्या कामात व्यस्त असणारे घरी स्वस्थ कसे बसणार? त्यामुळे ऑनलाइन शिक्षणानंतर काय, हा प्रश्‍न उरतोच. म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. यात बहुतांश तरुण-तरुणींनी शेतीची वाट धरली आहे. यातून ते निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविताना ते दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students returned from pune doing farming in savner of nagpur