महाराष्ट्रात ‘बलात्कार राज’ सुरू आहे का? विश्वास पाठक म्हणाले, राहुल गांधी यांनी तसदी घ्यावी

राजेश चरपे
Thursday, 8 October 2020

हिंगणघाटच्या घटनेनंतर राज्य सरकारने दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजूनही हा कायदा राज्यात लागू झालेला नाही याकडेही पाठक लक्ष वेधले. उत्तर प्रदेशाप्रमाणे काँग्रेस नेते राहुल व प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन पीडित महिलेची भेट घेण्यासाठी वेळ काढावा असे पाठक यांनी म्हटले आहे.

नागपूर : उस्मानाबाद जिल्ह्यात मजूर महिलेवर वीटभट्टी चालकांनी आठवडाभर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आल्याने राज्यात ‘बलात्कार राज’ चालू असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या तीन घटना घडल्या आहेत. यावरून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच वाटेनासा झाला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता महाराष्ट्रात येऊन पीडित महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची तसदी घेणार का, असा सवालही पाठक यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव अशा सात ठिकाणी महिला व तरुणींना जाळून टाकण्याच्या घटना घडल्या.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

हिंगणघाटच्या घटनेनंतर राज्य सरकारने दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजूनही हा कायदा राज्यात लागू झालेला नाही याकडेही पाठक लक्ष वेधले. उत्तर प्रदेशाप्रमाणे काँग्रेस नेते राहुल व प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन पीडित महिलेची भेट घेण्यासाठी वेळ काढावा असे पाठक यांनी म्हटले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is rape raj going on in Maharashtra