
India AI Impact Summit: भारताने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पावलं टाकली आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्वदेशी एआय मॉडेल लाँच होईल. या एआय मॉडेलला पूर्णपणे भारतीय डेटा सेट्सवर प्रशिक्षित केलं जाईल. विशेष म्हणजे या मॉडेलला भारतातच होस्ट केलं जाणार आहे.
India AI Impact Summit मध्ये भारत या मॉडेलला औपचारिकपणे लाँच करेल. सरकारने एआयसाठी देशाच्या कम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चरला मजबुत करीत ३८ हजार GPUs तैनात केले आहेत. याचं सुरुवातीचं टार्गेट १० हजार यूनिटपेक्षा कित्येक पट अधिक आहे.