Chinese Apps : धोक्याची घंटा! या 119 चीनी अ‍ॅपनी भारतात वाढवलं टेन्शन; पुन्हा झाली डिजिटल स्ट्राइक, मोबाईल हॅक करणारे अ‍ॅप 'इथे' करा चेक

Chinese Apps Banned in India due to Secrity Concerns : भारत सरकारने 119 चीनी अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून काढण्याचे आदेश दिले आहेत. हे अ‍ॅप्स चीन आणि हाँगकाँगमधील डेव्हलपर्सशी संबंधित आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होऊ शकतो.
Chinese Apps Banned in India due to Secrity Concerns
Chinese Apps Banned in India due to Secrity Concernsesakal
Updated on

Chinese Apps in India List : भारत सरकारने पुन्हा एकदा डिजिटल कारवाई करत Google Play Store वरून 119 चीनी अ‍ॅप्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे अ‍ॅप्स चीन आणि हाँगकाँगमधील डेव्हलपर्सशी संबंधित असून, त्यापैकी अनेक व्हिडीओ आणि व्हॉईस चॅटिंगसाठी वापरले जात होते. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून सरकारने ही कठोर कारवाई केली आहे.

2020 पासून सुरू असलेली चीनी अ‍ॅप्सवरची बंदी

ही पहिली वेळ नाही. 2020 मध्ये TikTok, ShareIt, UC Browser यांसारख्या लोकप्रिय चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2021 आणि 2022 मध्येही भारताने अशा अ‍ॅप्सवर कारवाई करत अनेक अ‍ॅप्स हटवले होते. सरकारने IT Act 69A अंतर्गत ही बंदी लागू केली आहे.

डिजिटल स्ट्राइकमध्ये कोणत्या अ‍ॅप्सवर कारवाई?

MoneyControl च्या अहवालानुसार, बंद केलेल्या अ‍ॅप्सची नोंद Lumen डेटाबेसमध्ये आहे, ज्याचे व्यवस्थापन हार्वर्ड युनिव्हर्सिटी (अमेरिका) करते. यातील काही अ‍ॅप्स चीनशिवाय सिंगापूर, अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधील कंपन्यांनी विकसित केले आहेत.

Chinese Apps Banned in India due to Secrity Concerns
Vivo V50 Mobile : एकच झलक,सबसे अलग! परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाला Vivo V50 मोबाईल, सुपरफास्ट चार्जिंगसह 10 जबरदस्त फीचर्स बघाच

बंदी घातलेली काही प्रमुख अ‍ॅप्स

  • ChillChat – सिंगापूरच्या Mangostore कंपनीने विकसित केलेला व्हिडीओ चॅट आणि गेमिंग प्लॅटफॉर्म, 1 मिलियनहून अधिक डाउनलोड्स.

  • ChangApp – लोकप्रिय चीनी अ‍ॅप, ज्याने लाखो डाउनलोड्स मिळवले आहेत.

  • HoneyCam – ऑस्ट्रेलियन कंपनीने विकसित केलेला फोटो फिल्टर अ‍ॅप.

भारतीय सरकारने यातील 15 अ‍ॅप्स आधीच Google Play Store वरून हटवले असून, उर्वरित अ‍ॅप्सवरही टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे.

Chinese Apps Banned in India due to Secrity Concerns
Dance Video : 'लाज विकली काय?' रस्त्यावर शिक्षक अन् विद्यार्थिनीने केला अश्लील डान्स; संतापजनक Video व्हायरल

भारतीय युजर्स काय करू शकतात?

  • बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा वापर त्वरित थांबवावा.

  • सरकारच्या अधिकृत सूचना आणि अँड्रॉइड सिक्युरिटी अपडेट्सकडे लक्ष द्यावे.

  • सुरक्षित भारतीय किंवा जागतिक पर्यायांचा विचार करावा.

भारतातील डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. चीनशी संबंधित अ‍ॅप्सवर ही आणखी एक मोठी कारवाई असून, भविष्यातही अशा डिजिटल स्ट्राइक सुरू राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com