Chinese Smartphone Companies
Chinese Smartphone Companiesesakal

Chinese Smartphone : चीनला धक्का देण्याच्या तयारीत सरकार; 'या' स्मार्टफोनवर येणार बंदी!

भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Published on
Summary

भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

भारत चीनला (China) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार, सरकार चीनी स्मार्टफोन कंपन्यांना (Chinese Smartphone Companies) 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे मोबाईल विकण्यास मनाई करू शकतं. कारण, देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देणं हा या मागचा उद्देश असल्याचं म्हटलं जातंय.

सरकारला Lava, Micromax आणि इतर देशांतर्गत कंपन्यांना पुढं जाण्यासाठी मदत करायची आहे. सध्या चीनी स्मार्टफोन कंपन्यांचं बजेट सेगमेंट आणि 15,000 सेगमेंटमध्ये वर्चस्व आहे. यामध्ये काही शेअर्स सॅमसंग (Samsung) आणि इतर काही बिगर चायनीज कंपन्यांचेही आहेत. ब्लूमबर्गनं (Bloomberg) याबाबतचं वृत्त दिलंय.

Chinese Smartphone Companies
America : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर 'एफबीआय'चा छापा; जाणून घ्या कारण

अहवालात असं म्हटलंय की, भारत सरकार (Government of India) भारतीय स्मार्टफोन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतं. जर असं झालं तर Xiaomi, Poco, Realme आणि इतर चीनी कंपन्यांना याचं मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. परवडणाऱ्या स्मार्टफोन विभागात गेल्या अनेक वर्षांपासून चीनी कंपन्यांचं वर्चस्व आहे. एका अहवालात असं नमूद केलंय की, 12 हजार रुपयांपेक्षा कमी स्मार्टफोनची विक्री भारतातील एकूण मोबाइल विक्रीपैकी एक तृतीयांश आहे. हा आकडा जून 2022 च्या तिमाहीचा आहे. भारत आणि चिनी कंपन्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरूय. अनेक चिनी कंपन्याही भारत सरकारच्या रडारखाली होत्या. गेल्या महिन्यात करचुकवेगिरीप्रकरणी Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या काही चिनी कंपन्यांवरही कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com