Chandrayaan-5 missionESakal
विज्ञान-तंत्र
Chandrayaan-5: चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार! भारताकडून चांद्रयान-५ मोहीमेला सुरूवात, कधी लाँच होणार?
Chandrayaan-5 mission: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चंद्रावर संशोधन करण्यासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-५ ला मान्यता दिली आहे. सरकारने अलिकडेच हा मोठा निर्णय घेतला आहे.
भारताच्या अंतराळ संस्था इस्रोच्या चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेल्या सर्व चांद्रयान मोहिमांनी चंद्राबद्दल काही नवीन शोध लावले आहेतच. शिवाय एक नवीन विक्रमही रचला आहे. मग ते चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधणे असो किंवा जगात पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे असो. भारतीय चांद्रयान मोहिमेमुळेच भारतीय तिरंगा चंद्राच्या पृष्ठभागावर उंच फडकला आहे. आता भारताने चांद्रयान-५ मोहिमेची तयारी सुरू केली आहे.