
Bharat Forecast System weather update: भारतात हवामान अंदाजाच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. भारताने ‘भारत फोरकास्टिंग सिस्टीम (BFS)’ हे जगातलं पहिलं स्वदेशी विकसित केलेलं अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन हवामान मॉडेल यशस्वीपणे सुरू केलं आहे. या नव्या प्रणालीमुळे हवामानाचा अंदाज आता अवघ्या ६ किलोमीटरच्या अचूकतेने केला जाऊ शकणार आहे जे अमेरिका, युरोप आणि ब्रिटनसारख्या हवामानशक्तींपेक्षा अधिक अचूक आहे, कारण त्यांच्या प्रणाली ९ ते १४ किमीच्या अचूकतेवर काम करतात
BFS ही प्रणाली भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांनी संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केली आहे. ती आता भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रमुख अंदाज प्रणाली बनली आहे. यामुळे हवामान अंदाज ६४% अधिक अचूक होणार असून, पुर, चक्रीवादळं, उष्णतेच्या लाटा यासारख्या टोकाच्या हवामान घटनांचं ३०% अधिक अचूक भाकीत करता येईल.
ही प्रणाली ‘अर्का’ या सुपरकॉम्प्युटरवर चालवली जाते, ज्यामध्ये दररोज लाखो डेटा पॉइंट्सचे विश्लेषण केले जाते. सध्या भारतभर ४०हून अधिक डॉप्लर हवामान रडार्स कार्यरत असून लवकरच हे जाळं १०० पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या डेटावर आधारित BFS दर 6x6 किमीच्या ग्रिडवर अतिशय बारीकपणे हवामान अंदाज तयार करते.
या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी अधिक विश्वासार्ह हवामान माहिती मिळणार आहे. तसेच पूर किंवा वादळ यांसारख्या आपत्तींमध्ये आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी प्रतिक्रिया देऊ शकतील आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या दैनंदिन आयुष्यात हवामानाच्या अचूक अंदाजाचा उपयोग करता येईल.
ही प्रणाली केवळ भारतापुरती मर्यादित नाही. BFS संपूर्ण उष्ण कटिबंधीय भाग ३० अंश दक्षिण ते ३० अंश उत्तर अक्षांशांपर्यंत कव्हर करते, त्यामुळे भविष्यात ही प्रणाली जगभरातील देशांसाठीही महत्त्वाची ठरू शकते.
भारताने हवामान अंदाजाच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. BFS ही फक्त एक तांत्रिक प्रणाली नाही, तर ती भारताच्या संशोधनक्षमतेचा आणि क्षमतेचा ठसठशीत पुरावा आहे. हवामानाच्या लहरीपणाशी सामना करण्यासाठी ही प्रणाली भविष्यातील नवा आशावाद घेऊन आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.