AMCA Fighter Jet : भारताचं स्टेल्थ फायटर जेटवर काम सुरु; संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती

AMCA Fighter Jet: एमकाच्या अद्ययावत स्टेल्थ टेक्नॉलॉजी विमानाचं प्रोटोटाईप डिझाईन आणि मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
AMCA Fighter Jet
AMCA Fighter JetSakal

AMCA Fighter Jet: भारत गेल्या काही वर्षांपासून संरक्षण सिद्धतेत स्वयंपूर्तता आणण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. भारताचे स्वदेशी बनावटीचे स्वदेशी फायटर जेट अलीकडेच भारतीय हवाई दलात सामील झालं. भारत आपल्या स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पावर काम सुरु आहे. एमका (AMCA Fighter Jet) असं या विमानाचं नाव असणार आहे. या अद्ययावत स्टेल्थ टेक्नॉलॉजी विमानाचं प्रोटोटाईप डिझाईन आणि मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत स्वतःच एमकाचं अद्यावत मॉडेल तयार करत असल्याचं संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितलं आहे. (India starts work on stealth fighter jets; Information of the Minister of State for Defense)

AMCA Fighter Jet
ब्राह्मोस मिसाईलची रेंज 800 किमीपर्यंत वाढणार; संपूर्ण पाकिस्तान 'टप्प्यात'

एमका (AMCA) म्हणजे काय?

अद्यावत मध्यम लढाऊ विमान (Advanced Medium Combat Aircraft) अर्थात एमका हा भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी पाचव्या पिढीतील (Fifth Generation) अत्याधुनिक फायटर विमानं बनवण्याचा कार्यक्रम आहे. एमका हे सिंगल सिटर, दोन इंजिन, रडारपासून वाचवू शकणारं स्टेल्थ तंत्रज्ञान अशी या विमानाची वैशिष्ट्य आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये एरो-इंडिया शोमध्ये भारताने प्रथमच एमकाचे डिझाइन जगासमोर आणलं होतं. एजन्सी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट (ADA) आणि DRDO यांनी सादर केले होते.

AMCA Fighter Jet
भारताचं फायटर विमान 'तेजस'ला अमेरिकन इंजिनचं बळ

खासदार शांता क्षत्रिय यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, एमकाचे डिझाइन आणि प्रोटोटाइप मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एमकाचे हे अद्यापत लढाऊ विमान आधीच्या विमानांपेक्षा महाग आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com