ब्राह्मोस मिसाईलची रेंज 800 किमीपर्यंत वाढणार; संपूर्ण पाकिस्तान 'टप्प्यात' | Brahmos Supersonic Cruise Missile | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmos Supersonic Cruise Missile News Updates
ब्राह्मोस मिसाईलची रेंज 800 किमीपर्यंत वाढणार; संपूर्ण पाकिस्तान 'टप्प्यात' | Brahmos Supersonic Cruise Missile

ब्राह्मोस मिसाईलची रेंज 800 किमीपर्यंत वाढणार; संपूर्ण पाकिस्तान 'टप्प्यात'

भारताचे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याच्या वादादरम्यान समस्त भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची (Brahmos Supersonic Cruise Missile) ताकद वाढवणार आहे. हे क्षेपणास्त्र आता 800 किमीपर्यंतच्या शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करून उद्ध्वस्त करू शकणार आहे. यापूर्वी ब्राह्मोस मिसाईलची रेंज 300 किमी होती, ती वाढवून 500 किमी करण्यात आली आहे आणि आता ती आणखी दूर अंतरावरील लक्ष्यभेद करण्यास सक्षम असेल. ही क्षेपणास्त्रे सुखोई ३० एमकेआय (Su-30MKI) या लढाऊ विमानात बसवण्यात आली आहेत. (The range of the BrahMos missile will increase to 800 km)

हेही वाचा: चीन-पाकवर 'प्रलय'चं सावट; भारताकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

एएनआयने वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची रेंज 500 किमीपर्यंत वाढवण्यात आली होती. सॉफ्टवेअर अपग्रेड केल्यामुळे हे शक्य झाले. त्यासाठी क्षेपणास्त्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता या क्षेपणास्त्राची क्षमता 800 किमीपर्यंत वाढवण्यात यश आले आहे. फायटर प्लेनच्या माध्यमातून खूप उंचावरून ते सोडले जाऊ शकते. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) आपल्या 40 सुखोई फायटर विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. ही क्षेपणास्त्रे अधिक घातक ठरू शकतात आणि दूरवरच्या शत्रूची ठिकाणं उध्वस्त करू शकतात. सुखोई विमाने यापूर्वी तामिळनाडूतील तंजावर एअरबेसवर ठेवण्यात आली होती, परंतु लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर ती उत्तरेकडील सीमेवर तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा: ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलिपीन्सची स्वाक्षरी; चीनला झटका

भारताकडून ब्राह्मोसचं सातत्याने अपग्रेडेशन-

ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणावर भारत सातत्याने काम करत आहे. ब्राह्मोसच्या नौदलाच्या प्रकाराची क्षमता 350-400 किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शनिवारी ५ मार्च रोजी युद्धनौकेवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यादरम्यान क्षेपणास्त्राने त्याच्या नियोजित लक्ष्यावर अचूक मारा केला. ब्राह्मोस क्षेपणास्त्र रशियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. ते ध्वनीच्या तिप्पट वेगाने म्हणजे 2.8 मॅक वेगाने उडते. रडारला चकमा देण्याची खासीयत या मिसाईलमध्ये आहे. पूर्वी तिची रेंज 290 किमी होती, ती वाढवून 350-400 करण्यात आली. आता 800 किमी वेरिएंटवर काम सुरू आहे. ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या हवाई आवृत्तीची सुखोई 30MKI वरून गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आता ही मिसाईल इतर लढाऊ विमानांवरही तैनात करण्याची योजना आहे.

हेही वाचा: ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

अलीकडेच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हरियाणातील सिरसा येथून उड्डाण केले आणि पाकिस्तानमधील मियां चन्नू येथे पडले. सिरसा ते मिया चन्नू हे अंतर २७७ किलोमीटर आहे. यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला आहे. या क्षेपणास्त्र शस्त्रास्त्रांनी सुसज्ज नव्हते, परंतु झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत या भारताने प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.

Web Title: The Range Of The Brahmos Missile Will Increase To 800 Km The Whole Of Pakistan Will Come In Stages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top