Astronaut Shubhangshu Shukla : ‘अवकाशातून भारत भव्य दिसला’; पंतप्रधान मोदी यांचा अंतराळवीर शुभांशू यांच्याशी संवाद
Indian Astronaut : ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात झेप घेतलेले शुभांशू शुक्ला यांनी “अवकाशातून भारत पाहताना त्याची भव्यता मन हेलावून टाकणारी होती,” असे सांगितले.
नवी दिल्ली : ‘‘अवकाशातून पहिल्यांदा भारताकडे पाहिले, तेव्हा आपण नकाशावर पाहतो, त्यापेक्षा कितीतरी मोठा, भव्य भारत मला दिसला,’’ अशा शब्दांमध्ये भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी शनिवारी अवकाशातील अनुभवांचे वर्णन केले.