
भारतातील शैक्षणिक संस्था सायबर हल्ल्याच्या रडारवर
चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीमध्ये भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले . यातच भारतीय शिक्षण क्षेत्राला (Indian Education Sector) सायबर हल्ल्यांचा (Cyber Attacks) सर्वात मोठा धोका असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. भारतानंतर अमेरिका, ब्रिटन, इंडोनेशिया आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. सिंगापूरच्या एआय (AI) संचालित डिजिटल जोखीम व्यवस्थापन एंटरप्राइझ क्लाउडसेक (CloudSEK) च्या थ्रेट रिसर्च अँड इन्फॉर्मेशन अॅनालिटिक्स विभागाद्वारे हा अहवाल तयार करण्यात आलाय. (Indian Education Sector Biggest Target Of Cyber Attackers)
हेही वाचा: WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले..
या अहवालात भारतीय शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सायबर धोक्यांचे सर्वात मोठे लक्ष्य असल्याचे समोर आले. कोरोनामुळे सर्वकाही ऑनलाईन झालंय. शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा प्रसार या काळात मोठ्या प्रमाणात वाढला. यातच सायबर हल्ल्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ दिसून येत आहे.
हेही वाचा: तुम्ही सुद्धा RAWमध्ये दाखल होऊ शकता; हे आहेत मार्ग
भारतातील प्रामुख्याने BYJU, IIM कोझिकोड आणि तामिळनाडू डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इत्यादी ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मवरील सायबर हल्ल्यांचा समावेश आहे. तर भारतानंतर युनायटेड स्टेट्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोबतच हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांसारख्या मोठ्या संस्थांवरही सायबर हल्ल्यांचा समावेश आहे.
Web Title: Indian Education Sector Biggest Target Of Cyber Attackers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..