WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले.. | WhatsApp Latest Feature | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Latest Feature

WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले..

व्हाट्सॲप हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. व्हाट्सॲपचे सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते आहेत. आजच्या काळात व्हाट्सॲप वापरत नाही असा क्वचितच कोणी असेल. या ॲपच्या मदतीने क्षणार्धात मेसेज, फोटो-व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्सही शेअर करता येतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ख्याती असलेले व्हाट्सॲप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर आणत असतात.

आता व्हाट्सॲप कंपनी रिॲक्शन फीचरसह मार्केटमधील इतर ॲप्सशी स्पर्धा करणार आहे. अनेक दिवसांपासून व्हाट्सॲप यूजर्स या फीचरची वाट पाहत होते आणि आज ही प्रतीक्षा संपणार आहे. (WhatsApp is finally rolling out the Reactions feature to its users.)

हेही वाचा: जर तुम्ही हे पाच नियम मोडले तर WhatsApp होणार बॅन

व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचर्सनुसार युजर्स इमोजीच्या मदतीने मॅसेजवर त्यांचा अभिप्राय देऊ शकतील. आत्ता सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला फक्त 6 इमोजी मिळतील ज्यात लव, लाईक, laugh, थैंक्स, सरप्राइज आणि sad असे इमोजींचा समावेश असेल. पण येत्या काळात सर्व इमोजी असणार आहे.

कंपनीचे सीईओ (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले की, आजपासून व्हॉट्सॲप रिॲक्शन फीचर युजर्सला दिले जाईल.

हेही वाचा: WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर

टेस्टिंग कधीपासून सुरू होती?

व्हॉट्सॲप रिॲक्शन फीचरची 2018 पासून चाचणी केली जात होती. कंपनी आणखी नवीन फीचर्सची चाचणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात यूजर्स व्हॉट्सॲप द्वारे 2 जीबी पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकतील आणि 32 लोकांसोबत ग्रुप ऑडिओ कॉल करू शकतील.

Web Title: Whatsapp Is Finally Rolling Out The Reactions Feature To Its Users

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whatsapp
go to top