Twitter डाउन, केवळ भारतातील युजर्सच झाले त्रस्त

सकाळा ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

ट्विटर वर शुक्रवारी रात्रीपासूनच स्लो लॉगइन आणि लोडिंगच्या अडचणीबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्या.

Indian users complaining twitter down : भारतात काही युजर्संना ट्विटर वापर करताना समस्या येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर शुक्रवारी रात्रीपासूनच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डाउनडिटेक्टरच्या माध्यमातून याची पुष्टी देखील झाली आहे. डाउनडिटेक्टरवर देशभरातून 900 हून अधिक यूजर्संनी ट्विटर वापरण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वेबसाइट आणि मोबाइल APPवर ट्विटर वापरण्यात समस्या येत आहे. 

डाउनडिटेक्टरच्या माहितीनुसार, वेबसाइटवरुन ट्विटरचा वापर करणाऱ्या युजर्संना सर्वाधिक समस्या जाणवली, ऑनलाइन सर्विसे ट्रॅक करणाऱ्या डाउनडिटेक्टरने दावा केलाय की,  iOS एपवर देखील काही युजर्संना ट्विटर वापरण्यात अडचणी येत आहेत.  

फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी

ट्विटर वर शुक्रवारी रात्रीपासूनच स्लो लॉगइन आणि लोडिंगच्या अडचणीबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्या. रात्री 9 वाजल्यापासून देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, जयपुर, अहमदाबाद, मदुरा आणि बंगळुरुमधील अनेक युजर्संना या अडचणीचा सामना करावा लागला. अँड्रॉइड आणि डेस्कटॉ युजर्संना सर्वप्रथम ट्विटर वापरात अडचणीचा सामना करावा लागला. सध्याच्या घडीला सेवा सुरळीत झाली असली तरी ही तांत्रिक समस्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे.  ट्विटरने अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य केलेले नाही भारताशिवाय अन्य कोणत्याही देशात अशी अडचण आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian users complaining twitter down in india on friday 5 feb