
Jyoti Malhotra Latest Update : हरियाणामधील हिसार पोलिसांनी नुकतीच एक धक्कादायक कारवाई करत भारतातल्या प्रसिद्ध महिला युट्यूबरला अटक केली आहे. ‘Travel with JO’ या नावाने युट्यूबवर प्रवासवृत्तांत शेअर करणारी ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. तिच्या युट्यूब चॅनेलला तब्बल 3.7 लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. पण अॅप वापरताना तुम्ही काय काळजी घ्यावी हे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योतीने WhatsApp, Telegram, Snapchat सारख्या एनक्रिप्टेड अॅप्सच्या मदतीने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला (ISI) अत्यंत संवेदनशील माहिती पुरवली आहे. ती पाकिस्तानी हँडलर्ससोबत गुप्त चॅट्सद्वारे संपर्कात होती, अशी प्राथमिक कबुली तिने दिली आहे. या प्रकरणात आणखी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
या हेरगिरी प्रकरणात आणखी एक महत्त्वाचं नाव पुढं आलंय. अहसान-उर-रहीम उर्फ दानिश. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ज्योतीने पाकिस्तान दौऱ्यादरम्यान डॅनिशची भेट घेतली होती. तिथूनच दोघांचा संवाद सुरू झाला आणि त्यांनी नंतर एकत्र इंडोनेशिया दौराही केला होता. असेही सांगितले जात आहे की, दानिशच्याच ओळखीने तिला ISI एजंटपर्यंत पोहोचवण्यात आलं.
सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघड झालंय की, ज्योतीने तिच्या युट्यूब चॅनेलवरून पाकिस्तानविषयक सकारात्मक प्रोपोगंडा केला असण्याची शक्यता आहे.
“Indian Girl in Pakistan”, “Pakistanis are so loving” अशा शीर्षकाच्या व्हिडिओजमुळे आता तिच्या सामाजिक माध्यमातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
तपासादरम्यान आणखी एक मोठं खुलासं झालं ज्योतीने दिल्लीत पाकिस्तान उच्चायोगाच्या व्हीआयपी इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.
तिच्या या भेटी केवळ सौजन्याच्या होत्या की, हेरगिरीच्या उद्देशाने घडवून आणलेल्या? याचा सखोल तपास सुरु आहे.
ही घटना केवळ एक हेरगिरी प्रकरण नाही, तर सोशल मीडियाचा गैरवापर करून देशाच्या सुरक्षेचा भंग होण्याचं ज्वलंत उदाहरण आहे.
ज्योतीसारख्या प्रभावशाली युट्यूबरने प्रवासाचे बहाणे करत परदेश दौरे केले आणि गुप्त माहिती लपवून पाठवली, यामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडे आता अधिक सजग नजरेने पाहत आहेत.
तपास यंत्रणांकडून ज्योतीच्या मोबाईल, लॅपटॉप, आर्थिक व्यवहार, तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासांचे तपशील बारकाईने तपासले जात आहेत.
डीएसपी कमलजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने एनक्रिप्टेड अॅप्सचा वापर केल्याचं कबूल केलं आहे.
ज्योती मल्होत्रा प्रकरण हे केवळ एक युट्यूबरची चूक नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविरोधी कारवाया किती सहज शक्य आहेत, याचं भयावह उदाहरण आहे.
ही घटना भारतातील प्रत्येक डिजिटल कंटेंट क्रिएटरसाठी जागृतीचा अलार्म ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.