National Science Day : मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरवारे बाल भवनाची 'फिरती सायन्स लॅब' फायद्याची

राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. यावर्षी विज्ञान दिनाची थीम 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ' असून विज्ञान, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे आणि या क्षेत्रात देशातील विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर धोरणात्मक काम होत आहे.
National Science Day
National Science Daysakal

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. यावर्षी विज्ञान दिनाची थीम 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ' असून विज्ञान, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे आणि या क्षेत्रात देशातील विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर धोरणात्मक काम होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, खगोलशास्त्र, सौर आणि पवन ऊर्जा, सेमीकंडक्टर, हवामान संशोधन, अंतराळ संशोधन ते जैवतंत्रज्ञान या प्रत्येक क्षेत्रात भारत आघाडीवर आहे.

विज्ञान विषयातील देशाची प्रगतीने विज्ञान विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कमालीचा बदलला आहे. अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्र ते खगोल अंतराळ क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीने विज्ञान विषयात मुलांची रूची वाढली आहे. अगदी ग्रामीण भागातही कुतूहल, आवड, जिज्ञासेने भारावलेल्या विद्यार्थी विज्ञानाची उत्तमोत्तम सायन्स मॉडेल तयार करतात. जिल्हा परिषदेच्या गणोरी प्रशालेची सायन्स प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे. गरवारे कम्युनिटी सेंटरचे गरवारे बाल भवनची फिरती ' सायन्स लँब' ही तर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते आहे.

या गाडीत विज्ञानाचे प्रयोग ते माहिती आहे. आठ वर्षांपासून ही सायन्स लँब जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पाठवली जाते. शाळांमध्ये नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत 'अटल टिंकरिंग' प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या. तंत्रज्ञानातील नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे काम करून कौशल्य प्रवीण करणे आणि तळागाळातून लक्षावधी हायस्कूल संशोधक तरूण तयार करणे या हेतूने उपक्रम केंद्र सरकारद्वारे राबवला जात आहे. किचकट, डोईजड वाटणारे विज्ञान सोप्या शब्दांमध्ये आणताना नावाजलेल्या प्रकाशन संस्थाही मागे नाही. बेसिक सायन्स ते फिक्शनचा वापर करून चित्रपट तयार केले जातात आणि हे चित्रपट संपूर्ण जगात गाजले.

National Science Day
Probiotics : बहुपयोगी आरोग्यवर्धक प्रोबायोटिक्सचा शोध ; पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत ‘स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस’ जीवाणूवर संशोधन

विज्ञानाशी निगडित या प्रत्येक घटनांची नोंद घेताना मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी वाढली असून विज्ञानातील करिअरकडे मुल आकर्षित होत आहेत. विज्ञान लोकाभिमुख करणे, वैज्ञानिक संज्ञा सोप्या शब्दांमध्ये अनुवादित करणे, पर्यावरणाच्या आव्हानांना शाश्वत पर्याय देत तंत्रज्ञानाचा वापर अशा कितीतरी संधी विज्ञान विषयात आहे, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. विज्ञान- तंत्रज्ञानाकडे मुल आकर्षित होत आहेत. आमच्या वराहमिहीर विज्ञान केंद्राद्वारे आम्ही विज्ञान विषय वेगवेगळ्या प्रकारे हाताळतो. इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतो..मात्र बेसिक सायन्सची परिस्थिती जशी होती तशीच आहे. तरीही पारंपरिक शाखांऐवजी नवे करिअर करण्यासाठी प्रयत्न होतात. नवे शैक्षणिक धोरण लागू झाल्यावर हे बदल दिसू येतील.

प्रतिमा जाखेटे, मुख्य समन्वयक, वराहमिहीर विज्ञान केंद्र, ओंकार विद्यालय

मुल आणि पालकांमध्ये विज्ञानाची रूची वाढली आहे हे खरे आहे. मात्र नावाजलेल्या संस्थांम्ये पोचायचे कसे याविषयी अजूनही माहिती नसते. भारतात बेसिक सायन्समध्ये करिअर करता येणारे चांगले अभ्यासक्रम आहेत. फर्ग्युसन आणि आयुकाच्या सहाय्याने बीएसस्सी फिजिक्ससारखे अभ्यासक्रम उत्तम आहे. आयसर, नायसर सारख्या संस्थांची माहिती नसते. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च प्रयोगशाळा डॉ. विक्रम साराभाई यांनी स्वतः स्थापन केली. त्यामुळे मुल आणि पालकांपर्यंत माहिती पोचवण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सुदर्शन लोया, संस्थापक विज्ञान खगोलशास्त्र आणि संशोधन केंद्र क्र्युक्स व्ह्यू सेंटर विज्ञानावर आधारित पुस्तके दरवर्षी प्रकाशित होतात.

मात्र बेसिक सायन्सपेक्षा पर्यावरण, तंत्रज्ञान या विषयांवरील पुस्तकांना तुलनेत जास्त मागणी असते. मुलांसाठी खास विज्ञान कथांचे पुस्तके नेली जातात. जयंत नारळीकर, मोहन आपटे यांची पुस्तके तर आजही आवर्जून घेतली जातात. विज्ञान कथा, विज्ञानावर आधारित पुस्तकांसाठी नव्या लेखकांना आम्ही जोडून घेतोय.

अप्रुप देशपांडे, प्रतिनिधी, राजहंस प्रकाशन

'अटल टिंकरिंग' प्रयोगशाळा ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. आम्ही आजूबाजूच्या शाळांनाही यात सहभागी करून घेते. पूर्वी मुलांना वैज्ञानिक उपकरणांना हात लावू दिला जायचा नाही. इथे मात्र मुल प्रत्येक उपकरणे, साहित्य हाताळतात. यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळत असून विद्यार्थी पाठ्यपुस्तकांशिवाय वेगवेगळे प्रयोग करतात.

वंदना रसाळ, उपमुख्याध्यापिका, शारदा मंदिर प्रशाला

गरवारे बाल भवनची सायन्स लँब मुलांना उपयुक्त आहे. आम्ही ही फिरती प्रयोगशाळा गावागावात नेली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही प्रयोगशाळा खूप आवडते. लवकरच भारताच्या खगोलीय घडामोडी यात असतील. मुल मोठ्या कुतूहलाने इथले साहित्य बघतात. प्रश्न विचारतात. रोजच्या जीवनाचा आणि विज्ञानाचा संबंध सांगण्यावर आमचा भर आहे. मात्र अटल टिकरिंग प्रयोगशाळा अजून बर्याच शाळांमध्ये सुरू झाल्या नाही असे जाणवले.

सुनील सुतवणे, संचालक, गरवारे कम्युनिटी सेंटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com