Infinix ने लाँच केला JioPhone Next पेक्षा स्वस्त स्मार्टफोन, पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infinix

Infinix ने लाँच केला JioPhone Next पेक्षा स्वस्त स्मार्टफोन

Infinix कंपनीने लेटेस्ट स्‍मार्टफोन लाँच केले आहे. नुकतेच कंपनीने 48MP ट्रिपल-कॅमेरा सेटअप आणि MediaTek Helio G85 चिपसेटसह Infinix Note 11i सादर केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्ट 5 प्रो नावाचा आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन Infinix च्या Smart 5 सिरीजमधील लेटेस्ट एडीशन आहे. कंपनीने यापूर्वी निवडक बाजारपेठांमध्ये Smart 5 आणि Smart 5A लाँच केले होते. प्रो मॉडेल तीन डिव्हाइसमध्ये सर्वाधिक फीटर्स असलेला स्मार्टफोन आहे. हा डिव्हाईस लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. चला Infinix Smart 5 Pro ची किंमत आणि फीचर्ससह सर्व काही जाणून घेऊया..

किंमत काय असेल?

Infinix Smart 5 Pro सध्या पाकिस्तानमधील XPark ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर PKR 14,499 (अंदाजे 6,200 रुपये) मध्ये लिस्टेड आहे. हे 32GB इंटरनल स्टोरेजसह सिंगल 2GB रॅम व्हेरियंटमध्ये देखील येतो. हा डिवाइस ब्लॅक आणि ग्रीन या दोन रंगात लॉन्च करण्यात आला आहे. तसे पाहाता हा फोन Jio च्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next पेक्षा स्वस्त आहे, ज्याची वास्तविक किंमत 6,499 रुपये (वन टाईम पेमेंट केल्यास) आहे.

हेही वाचा: 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

Infinix Smart 5 Pro मध्ये काय खास आहे?

Smart 5 Pro हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. यामध्ये तुम्हाला 6.52-इंचाचा डिस्प्ले येतो आणि वरच्या बाजूला वॉटर-ड्रॉप नॉच आहे. स्क्रीनमध्ये HD+ रिझोल्यूशन आणि स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट दिलेला आहे. टॉपला असलेल्या लहान नॉचमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल तर मागील बाजूस, डिव्हाइसमध्ये चौरस-आकाराचे कॅमेरा मॉड्यूल आहे. यात एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला आहे.

या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये PowerVR GE8322 GPU आणि 2GB RAM देण्यात आले आहे. डिव्हाइसमध्ये 32GB इनबिल्ट मेमरी आहे, जी मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात एआय फेस अनलॉक सपोर्टसह रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. तसेच डिव्‍हाइस आउट ऑफ द बॉक्स Android 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top