इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार | New Instagram Features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

instagram

इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आज काल इंटरनेट आणि सोबतच सोशल मीडिया अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इंस्टाग्राम देखील त्यापैकीच एक आहे. इंस्टाग्राम लोकांना वापरण्यासाठी इंटरेस्टींग वाटावे यासाठी कंपनी यामध्ये वेळोवेळी अपडेट्स करत राहाते आणि वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स लॉंच केली जातात. गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी अशाच आणखी दोन फीचर्सची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या फीचर्सबद्दल..

इंस्टाग्रामचे ‘Rage Shake’ फीचर

अॅडम मोसेरी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, या अपडेटनंतर यूजर्सना इन्स्टाग्रामच्या कोणत्याही फीचरसाठी तक्रारी नोंदवणे सोपे होईल आणि ते आरामात त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील. इन्स्टाग्रामच्या 'रेज शेक' या फीचरमुळे तुम्हाला तुमचा फोन जोराने हलवून अॅपशी संबंधित कोणत्याही समस्येची तक्रार करता येणार आहे . इंस्टाग्रामने हे फीचर यूएस मधील अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी जारी केले आहे.

हेही वाचा: 'गुगल पे' वापरणे होणार आणखी सोपे; नुसते बोलून होतील पैसे ट्रांसफर

पोस्टमधून एक फोटो करता येईल डिलीट

आतापर्यंत इंस्टाग्राम वापरकर्ते तक्रार करत होते की जेव्हा ते त्यांच्या पेजवर एकापेक्षा जास्त फोटो पोस्ट करायचे तेव्हा त्यापैकी एक डिलीट करता येत नसे आणि एखाद्याला संपूर्ण पोस्टच डिलीट करावी लगते. दरम्यान इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटमुळे आता यूजर्सना अनेक फोटोंमधून कोणताही एक फोटो डिलीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या हे फीचर आयओएस युजर्सना देण्यात आले आहे पण लवकरच ते अँड्रॉईड यूजर्ससाठीही जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या फीचरला ‘Finally’ असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

loading image
go to top