Instagram DM New Features : इन्स्टाग्राम ठरले गेमचेंजर! ॲपमध्ये 4 जबरदस्त फीचर्सची झाली एंट्री, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकवर

Instagram DM New Features Updates : इन्स्टाग्रामने त्याच्या डीएम सेवा अपडेट केली असून, यामध्ये 'पर्सनल ट्रान्सलेटर' आणि म्युझिक स्टिकर यासारखी तीन रोमांचक फिचर्स जोडले आहेत. यामुळे संवाद अधिक सोपा आणि मनोरंजक होईल.
Instagram DM New Features Updates
Instagram DM New Features Updatesesakal
Updated on

Instagram New Features : इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी थेट संदेश (DM) सेवेत मोठा अपडेट आणला आहे. आता Instagram DMs ‘पर्सनल ट्रान्सलेटर’ म्हणूनही काम करणार आहेत. यासोबतच संगीत स्टिकर्स, मेसेज शेड्युलिंग आणि ग्रुप चॅट सुधारणा यांसारखी तीन नवीन वैशिष्ट्येही अॅड करण्यात आली आहेत.

इन्स्टाग्रामच्या नवीन अपडेटमध्ये काय खास?

Meta ने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये Instagram DMs साठी नवीन फिचर्स जाहीर केली आहेत. यामध्ये मल्टी-लँग्वेज ट्रान्सलेशन, म्युझिक स्टिकर्स आणि शेड्युलिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

1) ‘पर्सनल ट्रान्सलेटर’

आता युजर्सना चॅटमध्ये आलेल्या मेसेजवर टॅप केल्यावर त्याचे भाषांतर थेट त्याखाली दिसेल. यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी संवाद करणे सोपे होणार आहे. हा फीचर Meta च्या Facebook प्लॅटफॉर्मवर 2018 पासून उपलब्ध आहे, मात्र WhatsApp वर सध्या हा पर्याय नाही.

Instagram DM New Features Updates
WhatsApp Theme Feature : व्हॉट्सअ‍ॅप बनलं कलरफुल! आणखी एका जबरदस्त फीचरची झाली एंट्री; कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

2) म्युझिक स्टिकर्स

आता युजर्स Instagram DMs मध्ये गाण्याच्या स्टिकर्सद्वारे 30 सेकंदाचा ऑडिओ क्लिप शेअर करू शकतात. हा फीचर तुमच्या चॅटला अधिक मजेशीर आणि रोमँटिक बनवू शकतो.

3) मेसेज शेड्युलिंग

जर तुम्हाला कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, एखादी आठवण किंवा इतर महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असेल, पण तुम्ही व्यस्त असाल, तर हा फीचर उपयोगी ठरेल. युजर्स आता ठराविक वेळी आपोआप पाठवण्यासाठी मेसेज शेड्युल करू शकतात.

Instagram DM New Features Updates
Chinese Apps : धोक्याची घंटा! या 119 चीनी अ‍ॅपनी भारतात वाढवलं टेन्शन; पुन्हा झाली डिजिटल स्ट्राइक, मोबाईल हॅक करणारे अ‍ॅप 'इथे' करा चेक

इतर महत्त्वाचे अपडेट्स

ग्रुप चॅटमध्ये सुधारणा-

नवीन सदस्यांना ग्रुपमध्ये जोडण्यासाठी QR कोड इन्व्हिटेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मात्र, ग्रुप अॅडमिनकडे पूर्ण नियंत्रण राहील.

चॅट पिन करण्याची सुविधा-

आता युजर्स Instagram DM मध्ये 3 चॅट पिन करू शकतात.

यामध्ये व्यक्तिगत आणि ग्रुप चॅट दोन्ही पिन करता येतील.

Meta ने अधिकृतपणे हे फिचर्स लॉन्च केले आहेत, आणि लवकरच हे सर्व युजर्सपर्यंत पोहोचणार आहेत. Instagram वापरणाऱ्यांसाठी हे अपडेट नक्कीच गेमचेंजर ठरेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com