Instagram Down : पुन्हा एकदा इन्स्टाग्राम झालं डाऊन? यूजर्स आपोआप होतायत लॉगआऊट, 'एक्स'वर तक्रारींचा पाऊस

Meta Instagram : 70 टक्के यूजर्सना लॉगइन इश्यू होते, 19 टक्के यूजर्सना अ‍ॅप ओपन करण्यासाठी अडचण येत होती, तर 11 टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शनबाबत तक्रार नोंदवली आहे.
Instagram Down
Instagram DowneSakal

Instagram Down in US : मेटाचा इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा डाऊन झाल्याच्या तक्रारी यूजर्स करत आहेत. डाऊनडिटेक्टर वेबसाईटवर 5,000 हून अधिक यूजर्सनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेतील कित्येक यूजर्सचं अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याचं म्हटलं आहे. सोबतच ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये देखील अशाच तक्रारी समोर येत आहेत.

डाऊनडिटेक्टर (Downdetector) ही वेबसाईट अशा प्रकारचे आउटेज रेकॉर्ड करते. इन्स्टाग्रामच्या तक्रारींमध्ये 70 टक्के लॉगइन इश्यू होते, 19 टक्के यूजर्सना अ‍ॅप ओपन करण्यासाठी अडचण येत होती, तर 11 टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शनबाबत तक्रार नोंदवली आहे.

दोन आठवड्यांतील तिसरी वेळ

काही दिवसांपूर्वी देखील मेटाचे फेसबुक अन् इन्स्टाग्राम हे दोन्ही प्लॅटफॉर्म जगभरात डाऊन झाले होते. 6 मार्च रोजी केवळ हे दोन प्लॅटफॉर्मच नाही, तर अमेरिकेतील कित्येक वेबसाईट्स डाऊन झाल्या होत्या. यामध्ये गुगल, अमेझॉन अशा मोठ्या कंपन्यांचाही समावेश होता. अर्थात, काही तासांमध्येच या सर्व वेबसाईट्स पूर्ववत झाल्या. मेटाच्या दोन्ही वेबसाईट्सना दोन दिवसांपूर्वीच प्रॉब्लेम आला होता. आता आज पुन्हा एकदा इन्स्टाग्रामबाबत तक्रारी समोर येत आहेत.

'एक्स'वर तक्रारींचा पाऊस

दरम्यान, इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर यूजर्सनी आपली तक्रार मांडण्यासाठी पुन्हा एकदा 'एक्स'कडे (ट्विटर) मोर्चा वळवला आहे. कित्येक यूजर्सनी यावर मीम्स देखील शेअर केले आहेत.

मागच्या वेळी फेसबुक अन् इन्स्टा दोन्ही डाऊन झाल्यानंतर मेटाच्या अधिकाऱ्यांनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी मात्र अद्याप मेटाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com