

Instagram Reels Dominance in Urban and Rural India 2026
esakal
आजकाल सोशल मीडिया फक्त मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ताज्या अहवालानुसार, भारतातील तब्बल ९७% लोक दररोज मेटा प्लॅटफॉर्म्सवर व्हिडिओ पाहत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, शहरांमध्ये व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण ९८% असताना ग्रामीण भागातही हा आकडा ९४% पर्यंत पोहोचला आहे.
म्हणजेच महानगरांपासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत संपूर्ण भारत सध्या इंस्टाग्राम रील्सच्या स्क्रीनवर स्क्रोलिंग करण्यात व्यस्त आहे.