आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक डोळ्यांनी पाहता येणार 

वृत्तसंस्था
Saturday, 28 January 2017

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) आता उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, सद्यःस्थितीला पृथ्वीभोवती फिरणारे हे स्थानकच एक कृत्रिम उपग्रह असून, आकाशात तो एखाद्या गडद ठिपक्‍यासारखा दिसत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणांवरून आयएसएस दिसणार आहे. 
आयएसएस सध्या पृथ्वीपासून केवळ 400 किलोमीटर अंतरावरून फिरत असून, तो सेकंदाला आठ किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. तो दिवसातून 15 वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करत असल्याने आणि तो पृथ्वीच्या जवळ असल्याने लोक त्याला उघड्या डोळ्यांनीदेखील पाहू शकतात. 

यासाठी तुम्ही https://spotthestation.nasa.gov/home.cfm या संकेतस्थळावर जाऊन आपल्या शहराचे नाव टाकून आयएसएस पाहण्याच्या वेळांची माहिती घेऊ शकता. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथून आयएसएस तुम्हाला पाहता येणार आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या जवळच्या जागांची माहितीही मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत ही संधी उपलब्ध असेल असे समजते. 

कसे ओळखाल आयएसएस 
अंतराळ स्थानक हे तुम्हाला एखाद्या विमानासारखेच दिसेल किंवा एखादा मोठा तेजस्वी तारा आकाशातून जाताना दिसतो तसे काहीसे दिसेल. हे विमानापेक्षाही वेगाने जात असले तरी तुम्हाला डोळ्यांनी ते दिसेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International space station see your eye