Internet Explorer Will Shut Down| २७ वर्षांनंतर अखेर Internet Explorer बंद होणार; निरोपाचा दिवस ठरला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet Explorer Will be Stopped

२७ वर्षांनंतर अखेर Internet Explorer बंद होणार; निरोपाचा दिवस ठरला!

२७ वर्षांपासून सेवा देणारं मायक्रोसॉफ्टचं प्रसिद्ध ब्राऊजर इंटरनेट एक्सप्लोरर लवकरच बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या ब्राऊजरसाठी मायक्रोसॉफ्ट मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहे. (Microsoft will shut down internet explorer)

हेही वाचा: Google Maps Update: गूगल मॅपचं नवं फिचर, देणार हवामानाची माहिती

हा ब्राऊजर १९९५ साली विंडोज ९५ (Windows 95) साठी अॅड ऑन पॅकेज (Add-On Package) म्हणून सुरू करण्यात आला होता. हा ब्राऊजर मायक्रोसॉफ्ट पॅकेजसोबत फ्री मिळत होता. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार इंटरनेट एक्सप्लोरर १५ जूनपासून बंद होणार आहे. विंडोज १० (Windows 10) वर इंटरनेट एक्सप्लोरर देत असलेल्या सुविधा आता मायक्रोसॉफ्ट एज देणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक ब्राऊजर आहे.

हेही वाचा: या वापरकर्त्यांना युट्यूबकडून १ वर्ष मोफत सदस्यत्व; होणार १२९० रुपयांची बचत

यामध्ये इंटरनेट एक्सप्लोरर मोड (IE Mode) प्रदान करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने इंटरनेट एक्सप्लोररवर आधारित वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशन्स थेट मायक्रोसॉफ्ट एजच्या माध्यमातून वापरता येणार आहेत. जे लोक अद्यापही इंटरनेट एक्सप्लोरर वापरतात, त्यांना कंपनीने १५ जून २०२२ च्या आधी मायक्रोसॉफ्ट एजचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सर्च बॉक्समध्ये सर्च केल्यानंतर तुमच्या कम्प्युटर अथवा लॅपटॉपवर मायक्रोसॉफ्ट एज सहज उपलब्ध होईल.

Web Title: Internet Explorer By Microsoft Will Be Stopped From 15 June 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top