Inverter Care: इन्व्हर्टरचे 'हे' काम आजच घ्या करून, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान...

गरम हवामानामुळे इन्व्हर्टरमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. या कडक उन्हात तुमचा इन्व्हर्टरही खराब झाला असेल तर पुढील कामे लगेच केली पाहिजे.
Inverter Care:
Inverter Care:Sakal

Inverter Care Tips: उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो. देशातील काही भागात उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक समस्या असते. यामुळे सध्या अनेक घरांमध्ये इन्व्हर्टरचा वापर केला जात आहे. पण गरम हवामानामुळे त्यातही अनेक समस्या निर्माण होतात. या कडक उन्हात तुमचा इन्व्हर्टरही खराब झाला असेल तर पुढील कामे लगेच केली पाहिजे.

इन्व्हर्टरची वायरिंग तपासा

सर्वात आधी इन्व्हर्टरची वायरिंग नीट तपासावी. त्यात कोणतेही बिघाड नाही ना हे तपासावे. तार कुठेतरी कापली गेल्यास किंवा कालांतराने खराब झाल्यास, ती त्वरित बदलावी. तसेच इन्व्हर्टरचे कनेक्शन नीट तपासावे. कधीकधी सैल कनेक्शनमुळे समस्या उद्भवू शकतात. खराब झालेल्या तार वेळेवर बदलून घ्या.

इन्व्हर्टरची सर्व्हिसिंग

पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात इन्व्हर्टरवर जास्त भार असतो. अशावेळी इन्व्हर्टरची सर्व्हिसिंग करणे खूप महत्त्वाचे असते. इन्व्हर्टर वेळेत सर्व्हिसिंग करावे. इन्व्हर्टर दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा स्वच्छ करणे आवश्यक आहे. सर्व्हिसिंगमध्ये इन्व्हर्टरची स्वच्छता, ऑइलिंग आणि इतर तपासणी केली जाते.

Inverter Care:
Alert: तुमच्या फोनमधील प्री-इंस्टॉल असलेले ॲप्स वेळीच करा डिलीट,अन्यथा ...

बॅटरी देखील तपासा

इन्व्हर्टरची बॅटरी नीट तपासावी. उन्हाळ्यात बॅटरी लवकर खराब होण्याची भीती असते. यासोबतच बॅटरीची पाण्याची पातळी देखील तपासावी आणि आवश्यक असल्यास पाणी बदलावे. याशिवाय, बॅटरी टर्मिनल्स देखील पूर्णपणे स्वच्छ करावे. यासह, त्याच्या बॅटरी बॅकअपमध्ये देखील लक्षणीय वाढ होईल.

योग्य ठिकाणी ठेवावे

तुम्ही ज्या ठिकाणी इन्व्हर्टर ठेवले आहे ती जागा हवेशीर आणि कोरडी असली पाहिजे. थेट सूर्यप्रकाश येत असेल तर अशा ठिकाणी इन्व्हर्टर ठेवू नका. तसेच, इन्व्हर्टरच्या आजूबाजूला चांगली जागा असावी जेणेकरून हवेचा प्रवाह कायम राहील. जर तुम्ही इन्व्हर्टर अशा ठिकाणी ठेवला असेल जिथे सूर्यप्रकाश किंवा पाणी त्यावर पडते, तर जास्त उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होण्याचा धोका वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com