esakal | iPhone 13 सीरीज नंतर स्वस्त झाले iPhone 11, iPhone 12; पाहा नव्या किमती
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 12

iPhone 13 सीरीज नंतर स्वस्त झाले iPhone 11, iPhone 12

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अॅपलकडून नवीन आयफोन 13 सीरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या iPhone 12, iPhone 11 सीरीजच्या किंमती भारतात कमी झाल्या आहेत. त्यामुळे Apple चे फॅन्स हे स्मार्टफोन खरेदी करु शकतील. या नवीन किमती Apple India च्या वेबसाईटवर दाखवण्यात येत आहेत. चला तर मग पाहूयात iPhone 11 आणि iPhone 12 मॉडेल्सच्या नव्या किमती किती आहेत.

iPhone 12, iPhone 12 mini ची किंमत

आता iPhone 12 त्याची किंमत 64 GBस्टोरेज व्हेरियंटसाठी 65,900 रुपये आणि 128 GB व्हेरियंटसाठी 70,900 तसेच रु. 256 GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 80,900. रुपये ठेवण्यात आली आहे, iPhone 12 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झाला होता तेव्हा त्याच्या किमती या 64 GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 79,900 रुपये, 128 GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 84,900 आणि 256 GB स्टोरेज मॉडेलसाठी 94,900 रुपये इतक्या होत्या.

Apple च्या आयफोन 12 मिनीची किंमत आता ऑनलाइन स्टोअरवर 64 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 59,900 रुपय झाली आहे. ही किंमत या स्मार्टफोनच्य लॉन्च किमतीपेक्षा 10,000 रुपयांनी कमी आहे. तसेच 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपये आणि त्याच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता 74,900 रुपये झाली आहे. लाँचच्या वेळी आयफोन 12 भारतात मिनीची किंमत 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 69,900, तर त्याच्या 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 74,900 रुपय तसेच टॉप-एंड 256GB स्टोरेज व्हर्जन ची किंमत 84,900 रुपय होती.

Apple कंपनीने iPhone 13 सीरिज लॉन्च केल्यानंतर, अॅपलचे आयफोन 11 ची किंमत कमी झाली आगे. आता ग्राहक हा फोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात. iPhone 11 हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.

हेही वाचा: अ‍ॅपल iPhone 13, iPhone 13 Pro, iPad mini भारतात लॉंच

iPhone 11 ची किंमत आणि फीचर्स

आयफोन 11 च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची नवीन किंमत 49,900 रुपये ठेवण्यात आली आहे, तर त्याचे 128 GB स्टोरेज व्हेरियंट हे 54,900 रुपयांच्या नवीन किंमतीत उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 2019 मध्ये 68,500 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. iPhone 11 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या पेमेंटवर सूट देण्यात येत आहे. याखेरीज ग्राहक एक्सचेंज ऑफर मध्ये 38,400 रुपयांच्या किंमतीत iPhone 11 खरेदी करू शकतात.

iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचे रिझोल्यूशन 1792 x 828 पिक्सेल असून त्याच्या बाजूच्या बेजल्स पातळ आहेत. या स्मार्टफोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये 12MP चे दोन सेन्सर आहेत. तर व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 12 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. हा हँडसेट पांढरा, लाल, काळा, हिरवा आणि जांभळ्या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: iPhone 13 सीरीज लॉंच, काय आहेत फीचर्स-किमती? वाचा डिटेल्स

iPhone 13

Apple चे लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 13 लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत 79,900 सुरु होते. आयफोन 13 मध्ये A15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.1-इंच रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये पहिला 12MP मुख्य सेन्सर आणि दुसरा 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 12 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल.

loading image
go to top