iPhones 14 Launch : लॉंच होण्यापूर्वीच 'या' देशात iPhone वर बंदी, जाणून घ्या कारण

iphone 14 launch update iphone 12 iphone 13 iphone 14 sales banned in this country check details here
iphone 14 launch update iphone 12 iphone 13 iphone 14 sales banned in this country check details here

iPhone 14 Launch Update : ॲपल ही आयफोन बनवणारी कंपनी जगभरात खूप लोकप्रिय आहे. आज ॲपलचा मेगा इव्हेंट होणार असून यामध्ये आयफोन 14 लॉंच केला जाणार आहे. यादरम्यान नुकतेच एका देशाच्या सरकारने Apple च्या लेटेस्ट iPhone, iPhone 12 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्सवर बंदी घातली आहे. ही बंदी कोणत्या देशात लागू करण्यात आली आहे आणि त्याचा Apple वर कसा परिणाम होईल, चला सविस्तर जाणून घेऊया..

The Verge च्या रिपोर्टनुसार, Apple iPhones वर फोनसोबत चार्जर न दिल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. ब्राझील सरकारने चार्जरसह पॅक न केलेल्या iPhones ची विक्री सस्पेंड केली आहे. ब्राझिलच्या न्याय मंत्रालयाने Apple ला $2.38 मिलियन दंड ठोठावला आणि कंपनीला iPhone 12 आणि लेटेस्ट मॉडेल्सची विक्री रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच चार्जरसह न येणारे सर्व iPhone मॉडेल्सची विक्री सस्पेंड केली आहे.

Apple Inc ने iPhone 12 लाँच केल्यानंतर त्यांच्या फोन्ससोबत चार्जर देणे थांबवले होते. दरम्यान ब्राझीलच्या एका स्थानिक वृत्तपत्राने सांगितले की, Apple वेबसाइटद्वारे ब्राझीलमध्ये आयफोन 12 ची विक्री सुरू आहे. आता ब्राझीलने चार्जरशिवाय iPhones वर बंदी घातली आहे कारण Apple कंपना आज रात्री 'फार आउट' इव्हेंटमध्ये त्यांची लेटेस्ट आयफोन 14 सीरीज लॉन्च करणार आहे.

iphone 14 launch update iphone 12 iphone 13 iphone 14 sales banned in this country check details here
iPhone 14 Max Launch : आज लाँच होणाऱ्या ॲपलचा लेटेस्ट स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

ब्राझीलच्या ग्राहक एजन्सीने असा युक्तिवाद केला की, चार्जरशिवाय आयफोन ग्राहकांच्या खिशावर जास्तीचा भार टाकत आहे. सोबतच त्यांनी चार्जरसंबंधी अ‍ॅपलकडून मांडण्यात आलेला पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा देखील खोडून काढला आहे. Apple त्यांचे पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी इतर मार्ग शोधू शकते - जसे की USB-C वर स्विच करणे असे सांगितले आहे.आयफोन 12 डिव्हाइस सोबत चार्जर न दिल्याबद्दल ब्राझीलने Apple ला गेल्या वर्षी $2 मिलीयन दंड ठोठावला होता, कारण कंपनीने नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती आणि चार्जरशिवाय फोन विकणे सुरू ठेवले.

दरम्यान समस्या सोडवण्यासाठी ब्राझीलच्या सेनाकॉन या ब्राझिलियन ग्राहक संरक्षण एजन्सीसोबत काम करणार असल्याचे Apple Inc ने सांगितले आहे. तसेच या निर्णयाविरोधात आपण अपिल करणार असल्याचे अ‍ॅप्पल कंपनीने म्हटले आहे.

iphone 14 launch update iphone 12 iphone 13 iphone 14 sales banned in this country check details here
Phone : Apple Eventच्या आधी Googleची मोठी घोषणा; या दिवशी लॉन्च होणार Pixel 7

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com