
Apple Far Out इव्हेंटमध्ये कंपनीने आपली नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus तसेच कंपनीचे नवीन घड्याळ Apple Watch आणि नवीन Buds लाँच करण्यात आले आहेत. (New member coming to iPhone 14)
आयफोन 14 सीरीजची किंमतही आता अधिकृतपणे समोर आली आहे.
iPhone 14 - $799 (अंदाजे 63000रु.)
iPhone 14 Plus - $899 (अंदाजे 71,000रु.)
iPhone 14 Pro - $999 (अंदाजे 79000रु.)
iPhone 14 Max - सुरुवातीची किंमत: $1099 (अंदाजे 87000 रु)
ॲपलने आपलं नवीन घड्याळ देखील लाँच केलं आहे.
ॲप्पलने या कार्यक्रमात iPhone 14 मालिकेसोबत नवीन Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 लाँच केले आहेत.
यावेळी आयफोनचे मिनी मॉडेल लाँच करण्यात आले नाहीत.
iPhone 14 मध्ये अजून एका पाहुण्याची भर पडली आहे. हा पाहुणा आहे आयफोन 14 प्लस..
ॲपल कंपनीने आयफोन 14 मालिकेत आयफोन 14 प्लस सादर केला आहे. हे अगदी नवीन मॉडेल आहे. या मॉडेलने मिनी मॉडेलची जागा घेतली आहे. या आयफोन 14 प्लसमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले नॉच आहे. ॲपल आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस मध्ये A15 Bionic चिपसेट आहे. ॲपल यावेळी आयफोन 14 मालिकेत 5-कोर GPU आणत आहे.
आयफोन 14 चे फिचर्स काय आहेत?
आयफोन 14, आयफिन 14 प्लस यूएस मॉडेल्समध्ये सिम ट्रे नाही. कदाचित सिम ट्रे भारतीय मॉडेलमध्ये असू शकेल.
आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसमध्ये दोन 12-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत.
आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये ऑन डिस्प्ले मिळतो आहे.
आयफोन 14 प्रो मध्ये बेसिक कॅमेरा आता 48MP आहे.
आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये 1TB पर्यंतचे स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?
Apple Far Out इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आणि कंपनीच्या इव्हेंट पेजवर उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.