iPhone 15 Discount : अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा की विजय सेल्स? नव्या आयफोनवर कुठे मिळतोय सर्वात जास्त डिस्काउंट?

Apple iPhone 15 : HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास मोठा डिस्काउंट मिळत आहे.
iPhone 15 Discount
iPhone 15 DiscounteSakal

अ‍ॅपलची नवीन आयफोन-15 सीरीज काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आली होती. आता या नव्या आयफोनसाठी बुकिंग सुरू झालं आहे. सोबतच ई-कॉमर्स वेबसाईट्सवर देखील iPhone 15 सीरीजवर विविध प्रकारच्या ऑफर्स सुरू करण्यात आल्या आहेत.

अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा आणि विजय सेल्स या देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स स्टोअर्सवर iPhone 15 लिस्ट करण्यात आला आहे. सोबतच अ‍ॅपल वॉच सीरीज 9 आणि अ‍ॅपल वॉच अल्ट्रा या प्रॉडक्ट्सची बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. यातील कोणत्या स्टोअरवर कशा ऑफर्स सुरू आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

iPhone 15 Discount
iPhone 12 Banned : 'आयफोन-12'च्या विक्रीवर बंदी; प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन उत्सर्जन करत असल्याचा आरोप

अमेझॉन

ऑनलाईन शॉपिंगसाठी भारतातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅपपैकी एक असणाऱ्या अमेझॉनवर आयफोन-15 सीरीजची प्री बुकिंग सुरू झाली आहे. या ठिकाणी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून iPhone 15 बुक केल्यास 5000 रुपयांचा डिस्काउंट दिला जातो आहे. अमेझॉन 23 सप्टेंबरपासून पुढे या आयफोनची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील HDFC च्या क्रेडिट कार्डने आयफोन 15 बुक केल्यास 5,000 रुपये डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर EMI ऑप्शनही उपलब्ध आहे. कोटक महिंद्रा क्रेडिट कार्डने EMI वर आयफोन-15 घेतल्यास 10% डिस्काउंट मिळत आहे. तसंच, जुन्या आयफोनला एक्सचेंज केल्यास 51,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळू शकतो.

iPhone 15 Discount
New iPhone : आयफोन 15 Pro घ्यावा की 14 Pro? दोन्हीमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

विजय सेल्स

विजय सेल्सच्या वेबसाईटवर आयफोन 15 सीरीज प्री-बुक करताना विविध प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याच कार्डने नो कॉस्ट-EMI पर्यायही देण्यात येतो आहे.

याव्यतिरिक्त HSBC क्रेडिट कार्डने EMI वर आयफोन-15 घेतल्यास 7,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर येस बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI चा पर्याय निवडल्यास 2000 रुपयांपर्यंत 5% डिस्काउंट दिला जातो आहे.

iPhone 15 Discount
iPhone 15 : इस्रोने बनवलंय 'आयफोन-15' मधील महत्त्वाचं फीचर! काय आहे कनेक्शन? जाणून घ्या

क्रोमा

क्रोमाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही आयफोन-15 बुक करू शकता. अर्थात, ऑनलाईन बुकिंग करताना तुम्हाला पूर्ण पेमेंट आधीच करावी लागेल. तर, ऑफलाईन स्टोअरमध्ये तुम्ही 2,000 रुपये भरून बुकिंग करू शकता.

क्रोमामध्ये देखील HDFC क्रेडिट कार्डवर मोठी ऑफर सुरू आहे. या कार्डचा वापर करून EMI वर iPhone 15 Plus घेतल्यास 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तर प्रो मॉडेल्सवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. जुन्या मॉडेल्सना ट्रेड-इन केल्यास 6,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. क्रोमा स्टोअरवर 18 सप्टेंबरपासून आयफोन 15 सीरीजची बुकिंग सुरू होईल.

iPhone 15 Discount
Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या फुफाट्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com