iPhone 16 Leaks : 'ई.. हे काय बनवलं?'; नव्या आयफोनचा कॅमेरा पाहून भडकले नेटिझन्स

iPhone 16 Camera : माजिन बू नावाच्या एका लीकरने iPhone 16 मधील कथित कॅमेरा मोड्यूल कसं असेल याचा फोटो शेअर केला आहे.
iPhone 16 Camera Design
iPhone 16 Camera Design

iPhone 16 Camera Design Leaked : काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपल कंपनीने आयफोन 15 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता जगभरातील अ‍ॅपल फॅन्सना आयफोन 16 चे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नव्या आयफोनबाबत लीक्स समोर येत आहेत. यातच आता या फोनचा कॅमेरा कसा असेल याचा दावा करणारा एक फोटो समोर आला आहे.

माजिन बू नावाच्या एका लीकरने iPhone 16 मधील कथित कॅमेरा मोड्यूल कसं असेल याचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच अ‍ॅपल हब नावाच्या एका एक्स यूजरने देखील अशाच प्रकारच्या 'रॅडिकल' कॅमेरा डिझाईनचा फोटो शेअर केला आहे. (iPhone 16 Radical Camera)

नेटिझन्स चक्रावले

या डिझाईनला पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. हे डिझाईन अगदीच घाणेरडं दिसत असल्याचं कित्येक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. "Eww.. प्लीज अ‍ॅपल असं काही करू नका", "हे तर फिजेट स्पिनर वाटतंय..", "हवं तर आताचं डिझाईन कायम ठेवा, पण हे नको.." अशा प्रतिक्रिया एक्सवर (ट्विटर) पहायला मिळत आहेत. (iPhone 16 Leaks)

कसा असेल iPhone 16?

  • आतापर्यंत आयफोन 16 बाबत कित्येक लीक्स समोर आले आहेत. iPhone 16 Pro Max मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे.

  • नव्या आयफोनमध्ये अ‍ॅपल A18 बायोनिक चिपसेट आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात येईल असंही म्हटलं जात आहे.

  • iPhone 16 Pro आणि Pro Max या दोन स्मार्टफोनमध्ये अधिक मोठा डिस्प्ले देण्यात येईल असंही काही टिपस्टर्स सांगत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com