Iphone : आयफोन युजर्सची चिंता मिटली ! आता व्हॉट्सअप चॅनल बनवता येणार .. जाणून घ्या सोप्या स्टेप्स

तुम्हाला देखील असं चॅनल क्रिएट करता येणं शक्य
Iphone
Iphoneesakal

Iphone : जर तुम्हीही आयफोनवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर हे लेटेस्ट अपडेट तुमचा आनंद द्विगुणित करू शकते. कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून बरेच युजर्स व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करण्यासोबतच चॅनल कसा क्रिएट करायचा याचा ऑप्शन शोधत होते. पण आता याची वाट बघणं थांबवा.

कारण तुम्हाला देखील असं चॅनल क्रिएट करता येणं शक्य आहे. वास्तविक, व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटकडून एक नवा अहवाल समोर आलाय. या अहवालानुसार, आता iOS युजर्ससाठी WhatsApp चॅनल तयार करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Iphone
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

WhatsApp चॅनल काय आहे?

हे चॅनल फीचर WhatsApp वर नवीन आहे. या फीचरमुळे, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगले फॅन फॉलोइंग असलेले युजर्स व्हॉट्सअॅपवर चाहत्यांशी कनेक्ट होऊ शकतात. व्हॉट्सअॅप युजर स्वतःच्या नावाने एक चॅनेल तयार करू शकतो. इथे युजर्सला फॉलो करणारे सबस्क्राईबर दिसतात.व्हॉट्सअॅप वापरणारा कोणताही फॅन कोणताही न्यूज चॅनेल, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि यूट्यूबर शोधू शकतो. व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे, युजर्स त्याच्या सदस्यांना व्हॉट्सअॅपवर आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊ शकतो.

Iphone
Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

पण हे व्हॉट्सअॅप चॅनल तयार करायचं तरी कसं?

प्रत्येकासाठी व्हॉट्सअॅप चॅनेल तयार करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. एक सामान्य व्हॉट्सअॅप युजर स्वतःचे चॅनेल बनवू शकतो आणि लोकांशी कनेक्ट होऊ शकतो.व्हॉट्सअॅप चॅनल तयार करण्यासाठी, प्रथम तुम्हाला अॅप उघडावे लागेल.आता तुम्हाला अपडेट्स टॅबवर यावे लागेल.

Iphone
Travel Insurance: परदेशात शिक्षण घेताना प्रवास विमा का महत्त्वाचा आहे?

येथे Status च्या खाली चॅनेल दिसतील.सोबतच एक + चिन्ह दिसेल. तुम्हाला यावर टॅप करावे लागेल.आता तुम्हाला Create Channel वर टॅप करून आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करून चॅनेल तयार करावे लागेल.आयफोन युजर्स WhatsApp च्या iOS 23.20.76 व्हर्जन सह हे नवीन फीचर वापरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com